Khaire: कराडांना मंत्र्यांचे अधिकार तरी माहितयत का, सोमय्या शक्ती कपूरसारखा मिरवतो अन्…खैरेंची जीभ घसरली!
खैरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांनाही लक्ष्य केले. खैरे म्हणाले, मी या रस्त्याचे काम मंजूर केले होते. आता त्या कामाचे आज गडकरीसाहेंबाच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. मात्र, भागवत कराडांना राज्य मंत्र्यांचे काय अधिकार असतात, हे तरी माहीत आहे का, असा सवाल त्यांनी केला.
औरंगाबादः महाविकास आघाडी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडून खिंडीत गाठणारे भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) बोलताना आज माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली. किरीट सोमय्याला खूप खाज आहे. त्याने तिथे जायची काय गरज होती. हा फक्त स्टंट बाजी करतो. शक्ती कपूरसारखा मिरवत फिरतो, अशी खरमरीत टीका त्यांनी सोमय्यांवर टीका केली. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलीस (Khar Police station) स्थानकात गेले होते. त्यावेळी तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला किरीट सोमय्या यांना जावं लागलं. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत किरीट सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या यांनाही जखमा झाले. त्याच्या हनुवटीतून रक्त वाहत होतं. तर त्यांच्या शेजारी बसलेल्याला माणसाच्या हातातही तुटलेल्या खिडकीच्या काचा घुसल्या. या हल्ल्यानंतर आता किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांवर गंभीर आरोप केलेत. मला जीवे मारण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
काय म्हणाले खैरे?
सोमय्यांच्या आरोपाचा समाचार घेताना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, किरीट सोमय्याला खाज किती आहे. तो कशाला गेला तिथे. तिथे गेल्यावर मार खाणारच ना. त्याने मुद्दामहून प्रसिद्धीसाठी हा स्टंट केला. सोमय्या शक्ती कपूर सारखे काम करतो. तो फक्त बडबड करतो. त्या शिवाय काय करतो, अशा शब्दांत त्यांनी सोमय्यांवर टीका केली. मी येणार-मी येणार म्हणता. मात्र, राष्टपती राजवट लावणे एवढे सोपे नाही, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.
कराडांचाही घेतला समाचार
खैरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांनाही लक्ष्य केले. खैरे म्हणाले, मी या रस्त्याचे काम मंजूर केले होते. आता त्या कामाचे आज गडकरीसाहेंबाच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. मात्र, भागवत कराडांना राज्य मंत्र्यांचे काय अधिकार असतात, हे तरी माहीत आहे का, असा सवाल त्यांनी केला. कराड यांना अजून दिल्ली काहीच समजली नाही. ते फक्त इथे बडबड करतात. दिल्लीची माहिती करून घ्यायला खूप वेळ लागतो, असा दावा त्यांनी केला. इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!