Eknath Shinde | “तुम्ही फक्त बाळासाहेब यांचे…”, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी खेडमधील गोळीबार मैदानात 5 मार्चला घेतलेल्या सभेतून शिंदे शिवसेनेवर आरोप आणि टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे शिवसेनेकडून गोळीबार मैदानातच उत्तर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Eknath Shinde |  तुम्ही फक्त बाळासाहेब यांचे..., एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 10:04 PM

खेड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांच्या विचाराशी तडजोड केली. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या मोहापोटी उद्धव यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उबाठा गटाकडून 5 मार्च रोजी खेडमधील गोळीबार मैदानात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतून ठाकरे गटाकडून राज्य सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका आणि आरोप करण्यात आले होते. या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून उत्तर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत ते बोलत

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“बाळासाहेब हे तुमचे वडील होते, हे किती वेळा सांगणार? ते संपूर्ण जगाला मान्य आहे. पण ते सर्व शिवसैनिकांचं दैवत होतं. तुम्ही त्यांना वडील वडील करुन संकुचित करु नका. खोटी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका, राज्याची जनता सुज्ञ आहे, ती माफ करणार नाही”, अंसही शिंदे यांनी ठाकरेंना सुनावलं.

हे सुद्धा वाचा

“तुम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात.त्यांची संपत्ती आम्हाला नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे”, असं शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

आज खेडमध्ये सभा घेत आहोत ती काही ठाकरे गटाच्या आदळआपटला आणि थयथयाटाला उत्तर देण्यासाठी आलो नाही तर कोकणातील शिवसैनिकांच्या प्रेमाखातर ही विराट सभा घेत असल्याचे सांगत त्यांनी रामदास कदम आणि योगेश कदम यांचाही यावेळी गौरव केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेतून ठाकरे गटाबरोबरच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी राहुल गांधी यांच्यावर त्यांनी निशाणा साधताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यांच्यासोबत तुम्ही जाता, त्यांच्या गळ्यात गळा घालता असं म्हणत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी गद्दारी, खोके यांच्याशिवाय त्यांच्याकडे बोलण्यासाठी आता दुसरे शब्दच नाहीत. तेही शब्द ते फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी करत असल्याचा घणाघातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.