ठाकरे सरकारनं कोर्टाची फसवणूक केली? किरीट सोमय्या यांच्या काय आहेत पुरावे?

| Updated on: Nov 16, 2022 | 7:34 AM

महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

ठाकरे सरकारनं कोर्टाची फसवणूक केली? किरीट सोमय्या यांच्या काय आहेत पुरावे?
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर नवा आणि गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी यामध्ये म्हंटलंय, ठाकरे सरकारने कोर्टाची कशी फसवणूक केली, खोटे बोलले, त्याची कागदपत्रे, पुरावे 2 दिवसात मी प्रसिध्द करणार. परंतु यामध्ये किरीट सोमय्या यांनी कोणत्या प्रकरणात खोटे बोलले किंवा कोणत्या कोर्टाची आणि कशी फसवणूक केली याबाबत स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्याने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार असताना किरीट सोमय्या यांनी बऱ्याच वेळा घोटाळ्याचा आरोप केला होता. तर त्याच काळात विक्रांत घोटाळ्याप्रकरणी सोमय्या पिता पुत्रावर कारवाईसाठी प्रयत्न केले होते. एकूणच याबाबत किरीट सोमय्या यांच्या नव्या दाव्याने ठाकरे सरकारवर कोणता नवा आरोप होती याचा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

हे सुद्धा वाचा

सेव्ह विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आला होता, तर यावेळी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.

तर याच काळात किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये कोरोना काळात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना कोर्टात जाण्याची वेळ आणली होती.

दरम्यान, किरीट सोमय्या ठाकरे सरकारमधील कोणतं प्रकरण पुन्हा समोर आणणार ? ठाकरे सरकारने कोणत्या प्रकरणात कोर्टाची फसवणूक केली ? काय खोटे बोलले आहेत ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.