Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो माझ्यावर दगड भिरकावणार, हे पाहूनही पोलिसांनी काहीच केलं नाही, गृहसचिवांच्या भेटीनंतर सोमय्यांचा आरोप

पोलिसांनी सुरक्षेत त्रुटी ठेवल्यामुळेच सोमय्यांवर हा हल्ला झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पुणे पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने गृहसचिवांकडे केली आहे.

तो माझ्यावर दगड भिरकावणार, हे पाहूनही पोलिसांनी काहीच केलं नाही, गृहसचिवांच्या भेटीनंतर सोमय्यांचा आरोप
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 11:43 AM

नवी दिल्लीः भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुण्यात झालेल्या  हल्ल्याची चौकशी व्हावी, या मागणीसाठी किरीट सोमय्या आणि भाजपच्या खासदारांचे (BJP MP) शिष्टमंडळ आज नवी दिल्लीत दाखल झाले. शिवसेनेच्या गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला, असा थेट आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या हल्ल्याची चौकशी केली जावी, अशी विनंती त्यांनी गृहमंत्रालयाला केली. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन यासंदर्भातील विनंती त्यांनी केली. या भेटीनंतर किरीट सोमय्या आणि खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा शिवसेनेचे शंभर गुंड माझ्याकडे दगड भिरकावत होते, हे पाहूनही पुणे पोलिसांनी काहीच केलं नाही. उलट पोलीस त्यांची मदत करत होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

ते दगड भिरकावत असताना पोलीस बघत होते- किरीट सोमय्या

नवी दिल्लीत गृह सचिवांच्या भेटीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकाने संजय राऊत यांच्या कंपनीला बेनामी कंत्राटं दिली. 100 कोटी रुपयांचे घोटाळे झाले. हे घोटाळे मी उघड केले. त्यामुळे शिवसेनेच्या 100 गुंडांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं पुण्यात पोलिस आणि पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मिळून सेनेच्या गुंडांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. शंभर लोकं आत बसवले. त्याची व्हिडिओ क्लीपच आम्ही गृहसचिवांकडे सादर केली आहे. पुणे पोलिस कमिशनर अमिताभ गुप्ता यांच्यामुळे हे झालं. एक हवालदार माझ्यावर एवढा मोठा दगड मारतोय, पण त्याला एकानंह अडवलं नाही, पोलिसांनी गप्प राहण्याची भूमिका घेतली, यासंदर्भाने भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, गिरीश बापट, रक्षा खडसे, मनोज कोटक आदींनी मिळून आम्ही गृहसचिवांची भेट घेतली. शिवसेनेचे गुंड माझ्यावर दगड भिरकावत होते, तेव्हा पुणे पोलीस काहीच करत नव्हते, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. तसेच कोविड सेंटर घोटाळ्यातही चौकशी करावी, असे सांगितले. यावर गृहसचिवांनी या दोन्हीची सविस्तर चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.’

पुणे पोलीस आयुक्तांच्या कारवाईची मागणी

पुणे महापालिकेच्या इमारतीत किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. भाजप नेते किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा असतानाही शंभर शिवसैनिक त्यांच्यापर्यंत पोहोचलेच कसे? असा सवाल भाजप खासदारांनी केला आहे. झेड सुरक्षा असलेल्या व्यक्तीची जबाबदारी संबंधित शहरातील पोलीस आयुक्तांवर असते. त्यांनी सुरक्षेत त्रुटी ठेवल्यामुळेच सोमय्यांवर हा हल्ला झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पुणे पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने गृहसचिवांकडे केली आहे.

घटना नेमकी कुठे, कधी घडली?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या पुण्यात गेले होते. त्यावेळी म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी पुणे महापालिका परिसरात सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला आहे. शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा सुरक्ष रक्षकांनी सोमय्यांना तेथून हलवलं. मात्र या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओत काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसतात. शिवसैनिकांनी जीव घेण्याच्या उद्देशाने नियोजन करून केलेला हल्ला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

इतर बातम्या-

PMPML बसच्या चाकासोबत फरफटत गेल्या, पुण्यात 75 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Nagpur NMC | नगरसेवकांचा भूमिपूजनाचा सपाटा, नागपुरात नागरिकांचा विरोध, विक्की कुकरेजा यांच्याविरोधात नागरिक संतप्त

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.