‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’, मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना, शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा सोबत
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) अधिकच आक्रमक झाले आहेत. हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत.
मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) अधिकच आक्रमक झाले आहेत. हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत 40 ते 50 गाड्या भरून शेकडो कार्यकर्ते दापोलीला (dapoli) रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिला. घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही मीडियाला दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मंत्र्यांचं हॉटेल तात्काळ पाडावं. आज जर हे रिसॉर्ट पाडलं नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी जोरदार हल्ला केला.
आज सकाळीच किरीट सोमय्या यांच्या घराखाली 40 ते 50 गाड्यांची रांग लागली होती. यावेळी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या घोषणा दिल्या. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता.
आधी पोलीस ठाण्यावर धडक
सोमय्या यांचे चिरंजीव आणि भाजप नगरसेवक नील सोमय्या यांनी या संपूर्ण रोड शोची माहिती दिली. आज सोमय्या यांचा आज दापोलीत मार्च सुरू होणार आहे. अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी हा मार्च काढण्यात येत आहे. सोमय्या यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आधीच विरोध केला आहे. या निमित्ताने सोमय्या यांचं शक्तीप्रदर्शन सुरू आहे. मुंबईत थेट खेड आणि खेडहून दापोलीपर्यंत 100 वाहनांचा ताफा त्यांच्या ताफ्यात असणार आहेत. दापोलीत गेल्यावर सोमय्या सुरुवातील पोलीस ठाण्यावर धडकणार आहेत. त्यानंतर मुरूड येथील साईल रिसॉर्टवर हा मार्च जाणार आहे.
सोमय्या यांचा निर्धार
आपल्या मंत्र्याच्या अनधिकृत बांधकामाविषयी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन का दिलं नाही? आपल्या बेनामी मालमत्तेबाबतही मुख्यमंत्री का बोलले नाही? असा सवाल करतानाच मुख्यमंत्री काही बोलो न बोलो आम्ही जनतेसमोर हा भ्रष्टाचार उघड करणारच, असा निर्धारही सोमय्या यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : घोटाळेबाज सरकारचा हातात हातोडा घेऊन सत्यानाश करणार -किरीट सोमय्या