किरीट सोमय्या यांचा नवा आरोप, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणता आणि कसा घोटाळा केला? सोमय्या काय म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांनी चुकीची कंपनी स्थापन करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत पुरावे देखील सादर केले आहे.

किरीट सोमय्या यांचा नवा आरोप, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणता आणि कसा घोटाळा केला? सोमय्या काय म्हणाले...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 2:15 PM

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. किरीट सोमय्या यांनी गैर व्यवहार कसा केला हे सांगत थेट पुरावे दाखवत हल्लाबोल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच हा घोटाळा झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हणत आता काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला आहे. संजय महादेव अंधारी यांच्या बोगस सह्या करून फसवणूक केली आहे. कोर्टाने कंपनी अॅक्ट नुसार 2013 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. यामध्ये साईप्रसाद किशोर पेडणेकर, गिरीश रमेश देवणकर, प्रसाद महेश गवस, कैलास प्रशांत गवस यांच्या नावाने समन्स निघाले आहे. सहा फेब्रुवारीला त्यांना समन्स बजावले होते. माझा प्रश्न उद्धव ठाकरे यांना असल्याचे म्हणत ठाकरे सेना पालिका काय चालवायची म्हणत हल्लाबोल केला आहे. ज्या कंपनीचे रजिस्ट्रेशन त्यावेळी चुकीचे कागदपत्रे त्यावेळी दिले आहे. त्यानंतर 2017 लाही या कंपनीत जे कागदपत्रे दाखवले त्यात व्यक्ती दुसरी आहे आणि सही आणि फोटो करणारा व्यक्ती दूसरा आहे तो व्यक्ती किशोरी पेडणेकर यांचा भाऊ असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांनी चुकीची कंपनी स्थापन करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

पेडणेकर कुटुंबीयांनी जो करारनामा दिला आहे त्यावर संजय महादेव अंधारी यांचा नाहीये, संजय अंधारे यांची नाही.

हे सुद्धा वाचा

तो फोटो संजय कदम यांचा लावला आहे. आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लाखों कोट्यवधी रुपये दिले आहे.

जे कोरोना सेंटर उभारले आहे. त्यात एकही पेशंट नव्हता, आणि असे कुठेच सेंटरही नव्हते असा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

विशेष म्हणजे हे कोरोना सेंटर 12 महिन्यात बंद करण्यात आले आहे. त्यासाठी 2 ते 7 वर्षाची सजा आहे, आणि यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांना विनंती करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.