मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिसूनची आज (26 नोव्हेंबर) रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे.
मागील अनेक दिवसांपासून एमपीएसी आयोगाचा पूर्ववेळ अध्यक्ष नव्हता. आयोगावर पूर्णेवेळ अध्यक्ष देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात होती. त्यानंतर आता राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. निंबाळकर यांचा कार्यकाळ यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षासाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील. अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले आहे. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त मा. अध्यक्षांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे. pic.twitter.com/jNJ9PAj9Nv
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 26, 2021
दरम्यान, याआधी सतीश गवई हे आोयाचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. ते ऑगस्टमध्ये निवृत्त झाले. त्यांतर नंतर हे पद दयानंद मेश्नाम यांच्याकडे देण्यात आलं. ते निवृत्त झाल्यानंतर आता पुर्णवेळ अध्यक्ष म्हणून किशोर राजे निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. सध्या आयोगात एक अध्यक्ष आणि तीन सदस्य आहेत.
इतर बातम्या :
कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : बिनविरोध निवड झाल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंय, पण त्यांना यश येणार नाही; भुजबळांचा टोला
सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर संप मिटणार?; कर्मचारी संघटना आणि अनिल परब यांच्यात चर्चा सुरू