चोराने सैफच्या घरातील ‘या’ व्यक्तीला ओलीस धरलं? मध्यरात्री घरात घडला थरार; नवा खुलासा धक्कादायक
अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकूनं हल्ला करण्यात आला, आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
मुंबईमधून धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे आता समोर आले आहेत. सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तीकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला, सैफ सोबतच त्याच्या घरी काम करणाऱ्या आणखी एका महिला कर्मचाऱ्यावर देखील हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती शेजारच्या एका बिल्डिंगमधून सैफच्या घरात सर्वांची नजर चुकून घुसली. मध्यरात्रीच्या सुमारास सैफच्या घरात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर या व्यक्तीचा आणि त्या महिला कर्मचाऱ्याचा वाद सुरू झाला. तो आवाज ऐकून सैफ अली खान आपल्या रूमच्या बाहेर आला. कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच या व्यक्तीनं सैफवर हल्ला केला. यावेळी आरोपी आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट देखील झाली, मात्र त्या व्यक्तीनं सैफवर चाकूचे सहा वार केले. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान सैफवर हल्ला करण्यापूर्वी हा व्यक्ती सैफ अली खानचा छोटा मुलगा ज्या रूममध्ये झोपला होता, त्या रूममध्ये देखील गेल्याची माहिती समोर येत आहे. तिथे त्याने सैफ अली खानच्या मुलाची केअर टेकर असलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावला. तिच्यावर देखील हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात ती देखील जखमी झाली आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्या व्यक्तीनं सैफ अली खानकडे एक कोटी रुपयांची मागणी देखील केली होती असा दावा केला जात आहे.
या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला होता, त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असून, आता त्याची प्रकृती सुधारली आहे. त्याला उद्याच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.