Covid vaccine : कोरोनाच्या लसीमुळे कोणते साईड इफेक्टस शक्य; राजेश टोपेंकडून महत्त्वाची माहिती

लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. मात्र, ही लक्षणे जीवघेणी नाहीत. | Covid vaccine side effects

Covid vaccine : कोरोनाच्या लसीमुळे कोणते साईड इफेक्टस शक्य; राजेश टोपेंकडून महत्त्वाची माहिती
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 12:15 PM

मुंबई: राज्यात येत्या 16 तारखेपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 15 तारखेच्या रात्रीपर्यंत आठ विभागांतील रुग्णालयांमध्ये लसींचा साठा पोहोचेल. त्यानंतर 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापसून प्रत्यक्ष लस देण्याच्या कामाला प्रारंभ होईल. मात्र, कोरोनाची ही लस घेतल्यानंतर काही किरकोळ दुष्परिणाम (Side effects) जाणवू शकतात. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला. (below 18 years person and pregnant women will not get corona vaccine says Rajesh Tope)

राजेश टोपे यांनी कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काहीजणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, अशी हमी राजेश टोपे यांनी दिली.

‘या’ लोकांना लस मिळणार नाही

कोरोनाची लस (corona vaccine) ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आल्याचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे. 18 वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

‘लस घ्यायला नकार देऊ नका, समाजात सकारात्मक संदेश पोहोचवा’

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार देऊ नये. तुम्ही लस घेऊन अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना केले.

संबंधित बातम्या:

जगभरात भारतीय कोरोना लसी सर्वाधिक स्वस्त, अफवांवर विश्वास ठेवू नका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?

Corona Vaccine | मुख्य डेपो ते आठ डेपो, तुमच्यापर्यंत लस कधी पोहोचणार, राजेश टोपेंनी मायक्रोप्लॅन सांगितला

(below 18 years person and pregnant women will not get corona vaccine says Rajesh Tope)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.