आमटे परिवारातील वाद ते विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या, कोण होत्या शीतल आमटे?

तरुण सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आमटे परिवारातील वाद ते विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या, कोण होत्या शीतल आमटे?
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 5:03 PM

मुंबई : तरुण सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मागील काही काळापासून बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन या सामाजिक उपक्रमाबद्दल बरेच वाद होते. या सर्व वादांच्या केंद्रस्थानी असलेल्या शीतल आमटे यांनी अखेर आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. यानंतर शीतल आमटे यांच्या कामाविषयी आणि त्यांच्या संदर्भातील वादाबाबत चर्चा होत आहे (Know all About Social Activist Sheetal Amte and controversies around her work).

कोण होत्या शीतल आमटे?

शीतल आमटे या शिक्षणाने डॉक्टर होत्या. त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात होत्या. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे त्यांचे आई-वडील आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक क्षेत्रात कामाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. शीतल आमटे यांनी मशाल आणि चिराग या कार्यक्रमांची उभारणी केली होती. त्याच्या त्या संस्थापक होत्या. त्यांनी नुकतंच निजबल नावाचं एक सेंटरही सुरु केलं होतं. याअंतर्गत शारीरिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी काम केलं जात होतं.

सध्या त्या आनंदवनला देशातील आदर्श स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी देखील काम करत होत्या. या अंतर्गत आनंदवनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक उत्पादन आणि आर्थिक स्थैर्य अशा अनेक घटकांचा यात विचार करण्यात येत होता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जानेवारी 2016 मध्ये त्यांना ‘यंग ग्लोबल लिटर 2016’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यानंतर त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या तज्ज्ञांच्या पॅनलचं सदस्यत्व देखील देण्यात आलं होतं.

शीतल आमटे संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड इनोव्हेशन ऑर्गनायझेनच्या समन्वयक म्हणूनही काम करत होत्या. त्यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामासाठीच 2016 चा रोटरी व्हॅकेशनल इक्सलन्स पुरस्कारही भेटला होता. त्या इंक फेलोवशिपच्याही मानकरी ठरल्या होत्या. त्या एक्स्प्रेस हेल्थ पुरस्कार आणि एक्स्प्रेस हेल्थकेअर पुरस्कार निवड समितीच्याही सदस्य होत्या. लॅन्सेट आयोगाने त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्वासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (दिल्ली) या संस्थेच्या त्या सल्लागार होत्या.

आमटे कुटुंबाभोवतीचा नेमका वाद काय?

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर त्यांची दोन मुलं डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांनी हे सामाजिक काम पुढे नेण्याचा निर्णय घेतला. काही काळाने आनंदवन प्रकल्पनाची जबाबदारी डॉ. विकास आमटे आणि त्यांच्या कुटुंबाकडे देण्यात आली. तर डॉ. प्रकाश आमटे 1973 मध्ये आपल्या कुटुंबासह लोकबिरादरी प्रकल्पाचं काम सुरु करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे स्थलांतरीत झाले. तेथे त्यांनी आदिवासींमधील गोंड, माडिया समाजातील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न, शिक्षण आणि उपजीविका यासाठी अनेक उपक्रम सुरु केले.

काही काळाने आमटे कुटुंबातील तिसरी पिढी देखील या सामाजिक कामात सहभागी झाली. डॉ. शीतल आमटे याच तिसऱ्या पिढीतील सदस्य. त्या डॉ. विकास आमटे यांच्या कन्या. 2016 मध्ये बाबा आमटे यांच्या सामाजिक कामाची मातृसंस्था असलेल्या महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारीणी जाहीर झाली. यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांनाही जबाबदारी देण्यात आली. आनंदवनमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असं नव पद तयार करुन त्यावर शीतल आमटे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्याचे पती गौतम कराजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक पदी नियुक्त करण्यात आलं. गौतम कराजगी यांनी आपल्या बहुराष्ट्रीय कंपनीतील कामानुसार आनंदवनातही अनेक मोठे बदल केले. येथेच वादाची ठिणगी पडली.

आनंदवनात अनेक वर्षांपासून काम करणारे आणि डॉ. विकास आमटे यांचे जवळचे सहकारी राजू सौसागडे यांनी शीतल आमटे आणि गौतम कराजगी यांच्यावर मनमानी कारभाराचा आणि आपला छळ केल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल केली. बाबा आमटे यांचे सहकारी शंकरदादा जुमडे यांचा मुलगा विजय जुमडे यांनीही या नव्या प्रशासनावर गंभीर आरोप केले.

डॉ. शीतल आमटे यांच्याभोवतीचे वादाचे चक्र

आमटे कुटुंबीयांकडून चालवल्या जाणारे सर्वच सामाजिक उपक्रम महारोगी सेवा समितीच्या अंतर्गत चालवले जातात. वरोरा येथील आनंदवन संस्था ही या कामातील सर्वात आधी सुरु झालेली आणि नावारुपास आलेली संस्था. या समितीचा सर्वात सुरुवातीचा सामाजिक प्रकल्प असलेलं आनंदवन मागील काही दिवसांपासून अनेक वादांचं केंद्र बनलं होतं. या आनंदवन ही केवळ संस्था राहिली नव्हती तर ते एक सामाजिक बदलांचं केंद्र ठरलेलं गावही झालं होतं. याच ठिकाणी राहणाऱ्या आनंदवन प्रकल्पातील काही सहकाऱ्यांनी शीतल आमटे यांच्या कामावर अनेक गंभीर आरोप केले होते.

यानंतर शीतल आमटे यांनी 20 नोव्हेंबर 2020 रोजी फेसबुक लाईव्ह करत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला सख्खा भाऊ कौस्तुभ आमटे, काका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबावर बेछुट आरोप केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर काही वेळातच त्यांनी आपलं हे फेसबुक लाईव्ह डिलीटही केलं. यानंतर त्यांनी लवकरच आपण आपली अधिकृत भूमिका जाहीर करु असं सांगितलं. तसेच फेसबुक लाईव्ह डिलीट करण्यास भाग पाडल्याचंही म्हटलं.

विशेष म्हणजे शीतल आमटे यांच्या या जाहीर आरोपसत्रानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक जाहीर निवेदन देत शीतल आमटे यांच्या आरोपांचा जाहीर निषेध केला. तसेच लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन दिल्याचं आमटे कुटुंबीयांनी सांगितलं. तसेच शीतल आमटे या सध्या मानसिक ताण आणि नैराश्याचा सामना करत असल्याचीही कबुली आमटे कुटुंबीयांनी दिली.

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी केलेलं अखेरचं ट्विट आणि त्यांचं ‘वॉर अँड पीस’ पेटिंग

संबंधित बातम्या :

Dr. Sheetal Aamte | सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

Photos : समाजसेवेचा अविरत वसा घेणाऱ्या आमटे कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या ‘डॉ. शीतल आमटे-कराजगी’

‘आनंदवना’तली दाई: डॉ. शीतल आमटे!

गूगलच्या होम पेजवर ‘बाबा’

Know all About Social Activist Sheetal Amte and controversies around her work

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.