महाराष्ट्रात 28 जिल्ह्यात कोरोनाचं संकट पसरलं, लॉकडाऊन हाच पर्याय? वाचा सविस्तर
मागील आठवडाभरात महाराष्ट्रातील 36 पैकी तब्बल 28 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शिरकाव केलाय.
मुंबई : मागील आठवडाभरात महाराष्ट्रातील 36 पैकी तब्बल 28 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शिरकाव केलाय. 10 दिवसांपूर्वी राज्यातील कोरोना संसर्गाने डोकं वर काढलेल्या जिल्ह्यांची संख्या 21 वर होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार अलर्ट झालंय. त्याचाच परिणाम म्हणून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत काळजी घेण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुढील आठवडाभरात नागरिक कशी काळजी घेतात यावरच राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यायचा की नाही हे ठरवणार असल्याचंही स्पष्ट केलं (Know all about weather lockdown in Maharashtra amid Corona or not).
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नवे कोरोना हॉटस्पॉट तयार होत आहेत. यात अमरावीत, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्येही आता कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
फेब्रुवारी महिन्यात आलेल्या कोरोनाच्या नव्या लाटेचा केंद्रबिंदू विदर्भच असल्याचं सध्यातरी दिसतंय. कोरोना रुग्णांच्या संख्येत पुण्यानंतर आता थेट नागपूरचाच नंबर येतो आहे. नागपूरमध्ये 9 हजार 141 रुग्णांची नोंद आहे, तर पुण्यात सध्या 12 हजार 577 रुग्ण आहेत.
कोरोनाची दुसरी लाट येणार?
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही याविषयी तज्ज्ञांमध्येही अनेक मतभेद आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा वेग पाहता काही जाणकारांनी पुढील एक ते दोन महिने कोरोना रुग्णांची ही वाढ कायम राहिल असं म्हटलंय. मात्र, ही कोरोनाची दुसरी लाट नसल्याचंच अनेकांचं मत आहे. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून राज्य सरकारसोबतच नागरिकांनाही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
राज्यात लॉकडाऊन लागणार का?
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मागील आठवडाभरापासून वाढणारे कोरोना रुग्ण पाहता यावर नियंत्रणासाठी केवळ लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे की इतर काही यावरही विचार केला जातोय. मात्र, सध्या तरी राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना हॉटस्पॉट सापडत आहेत तेथे कठोरपणे निर्बंध लादले जात आहेत. मात्र, सरसकटपणे लॉकडाऊन लावणं सरकार टाळत आहे. यामागे मागील लॉकडाऊन काळात विस्कटलेली आर्थिक घडी आणि सर्वसामान्यांचे हाल हाही दृष्टीकोन आहे. त्यामुळेच सध्या तरी राज्यात जेथे कोरोना हॉटस्पॉट तेथे निर्बंध असंच धोरण आहे.
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
हेही वाचा :
कोरोना बळी ठरलेल्या पालिकेच्या 93 कर्मचाऱ्यांना 50 लाखांची मदत नाहीच; केंद्राने प्रस्ताव नाकारले
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची मोठी घोषणा
देगाव शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गानं प्रशासन सतर्क, आतापर्यंत 3 वेळा आरोग्य तपासणी
व्हिडीओ पाहा :
Know all about weather lockdown in Maharashtra amid Corona or not