Sunetra Pawar VS Supriya Sule : सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, कोण जास्त श्रीमंत ? कोणावर किती कर्ज ? बारामतीत नणंद जिंकणार की वहिनी?
Sunetra Pawar Networth : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा नणंद वि. वहिनी असा सामना रंगणार आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबाची लेक सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबातील सून, सुनेत्रा पवार या दोघीही यंदा निवडणुकीत एकमेकींच्या समोर उभ्या ठाकणार आहेत. त्याच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास आज सुरूवात झाली. देशभरासह महाराष्ट्रातही पाच जागांवर मतदान होत आहे. यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नणंद वि. वहिनी असा सामना रंगणार आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबाची लेक सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबातील सून, सुनेत्रा पवार या दोघीही यंदा निवडणुकीत एकमेकींच्या समोर उभ्या ठाकणार आहेत. त्याच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. बारामती मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शरद पवार उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीमधून अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघींनी निवडणूक प्रतिज्ञापत्राल दाखल केले असून त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे, याची माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे किती संपत्ती ?
सुनेत्रा पवार या, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असून यंदा त्या पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. सुनेत्रा पवार यांनी संपत्तीबाबतचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. त्यानुसार, सुनेत्रा पवार यांची एकूण मालमत्ता 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये आहे. त्यांच्याकडे 3 लाख 36 हजार 450 रुपये इतकी रोख रक्कम आहे. तर सुनेत्रा पवार यांच्या बँकेत एकूण 2 कोटी 97 लाख 76 हजार 180 रुपये जमा आहेत. अजित पवार यांच्या बँकेतील ठेवी 2 कोटी 27 लाख 64 हजार 457 रुपये आहेत. सुनेत्रा पवार यांच्यावर 12 कोटी 11 लाख 12 हजार 374 रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांचे पती, अजित पवार यांच्यावर 4 कोटी रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती समोर आली आह
सुप्रिया सुळेंची संपत्ती
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे या गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात कार्यरत आहेत. यंदा त्या त्यांची वहिनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणुकीसाठी उभ्या आहेत. संसदरत्न पुरस्काराने अनेकवेळा गौरवण्यात आलेल्या सुप्रिया सुळे या कोट्यवधींच्या मालक आहेत. त्यांनी संपत्तीबाबतचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले असून त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतीही कार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांच्यावर 55 लाख रुपयांचे कर्ज आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांचे बंधू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून 2019 मध्ये 55 लाख रुपये उसने घेतले आहेत. त्यामध्ये पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख रुपये, तर सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपये घेतले आहेत. सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे.