‘मास्क घालतोस की दंड करु’, सायकलवरुन फेरफटका, कोल्हापूरच्या आयुक्तांकडून खरडपट्टी
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी थेट सायकलवरुन प्रवास करत मास्क न वापरणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
कोल्हापूर : जिल्ह्यात ‘नो मास्क नो एन्ट्री’ ही मोहीम गतिमान होत आहे (Kolahpur Commissioner Dr. Mallinath Kalshetti Spread Awareness). त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी थेट सायकलवरुन प्रवास करत मास्क न वापरणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ‘मास्क घालतोस का? दंड करु’, अशा शब्दात खडेबोल सुनावत त्यांनी जनजागृती केली (Kolahpur Commissioner Dr. Mallinath Kalshetti Spread Awareness).
“बाबांनो मास्क घाला, तुमच्यासाठीच सांगत आहे रे, राजांनो”, असे लहान मुलांना सांगत त्यांनी आपल्या कामाचा दाखला दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या कामाच्या पद्धतीचा आणखी एक रुप कोल्हापूरकरांना पाहायला मिळालं.
महापालिकेच्या आयुक्तांना सायकलवरून प्रवास करताना पाहून अनेकजण आवाक झाले. अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.
कोल्हापूर महानगरपालिकेत महिन्याचा शेवटचा दिवस ‘व्हेईकल डे’ म्हणून पाळाला जातो. एकही नगरसेवक, अधिकारी शासकीय आणि खाजगी वाहन न वापरता महापालिकेत येतात. सुरुवातीच्या काळात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला मात्र नंतर बहुतांशी पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना याचा विसर पडला. मात्र, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी नियम आजही पाळत आहेत (Kolahpur Commissioner Dr. Mallinath Kalshetti Spread Awareness).
आज देखील डॉ. कलशेट्टी सायकलवरुन महापालिकेत दाखल झाले. आपले दैनंदिन कामकाज आटपून त्यांनी आज दिवसभर शहरात सायकलवरुन फेरफटका मारला. त्यावेळी अनेकजण विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले. आशा नागरिकांची आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी चांगलीच खरडपट्टी करत दंड वसूल करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील भाजीपाला, फेरीवाल्याना योग्य खबरदारीचा सूचना देत, रिक्षावाले, पानपट्टीधारकांना नियम पाळण्याचे आवाहन केले.
अविरतपणे सुरु आहे स्वच्छता मोहीम
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी कोल्हापुरात आयुक्त म्हणून दाखल झाल्यापासून त्यांनी प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहिमेचा उपक्रम सुरु केला. याला शहरातील तालीम मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे कलशेट्टी यांनी सलग 74 रविवारी अखंडितपणे ही स्वच्छता मोहीम सुरु ठेवली. त्यांच्या या स्वच्छता विषयीच्या धडपडी त्यांना स्वच्छता दूत अशी देखील एक नवी ओळख मिळाली.
कोरोनानंतर महाराष्ट्रावर नव्या विषाणूजन्य रोगाचं सावट, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशाराhttps://t.co/HAZCaZNysH
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2020
Kolahpur Commissioner Dr. Mallinath Kalshetti Spread Awareness
संबंधित बातम्या :
कोल्हापुरातील दोन तालुक्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू, कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्णय
नागपुरात कोरोनाचा उद्रेक, तरीही नागरिक बेफिकीर, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 27 लाख रुपयांचा दंड वसूल