बारवी धरणाजवळ कोळे गावाला बेटाचं स्वरुप, गावकऱ्यांना बोट प्रवासाशिवाय पर्याय नाही

बारवी धरणाची उंची वाढल्यावर अंदाजानुसार कोळे गावचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. मात्र गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी भूखंड मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर दररोज बोटीने प्रवास करण्याची वेळ आली आहे

बारवी धरणाजवळ कोळे गावाला बेटाचं स्वरुप, गावकऱ्यांना बोट प्रवासाशिवाय पर्याय नाही
Follow us
| Updated on: Aug 09, 2019 | 10:26 AM

मुरबाड : बदलापूरजवळ बारवी धरणाच्या (Baravi Dam) पाणलोट क्षेत्रात असलेल्या कोळे गावाला (Kole Village) बेटाचं स्वरुप आलं आहे. गावातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी गावकऱ्यांना जीव मुठीत धरुन बोटीने प्रवास करावा लागत आहे. कोळेवासी पुनर्वसनासाठी भूखंडाच्या प्रतीक्षेत आहेत.

कोळे गावाच्या तिन्ही बाजूंना बारवी धरणाच्या पाण्याचा वेढा पडला आहे, तर चौथी बाजू जंगलाने वेढलेली आहे. त्या मार्गावर दोन ओढे ओलांडावे लागत असल्याने गावकऱ्यांना गावाबाहेर ये-जा करण्यासाठी बोटीवर अवलंबून रहावं लागत आहे.

बारवी धरणाची उंची वाढल्यावर कोळे गावचा रस्ता पाण्यात बुडणार हे अधिकाऱ्यांना माहित होतं. त्यामुळे हे गाव विस्थापित करण्यासाठी नागरिकांना घराच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली. परंतु त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तूर्तास महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने लोकांना दोन रबरी होड्या दिल्या आहेत.

मुरबाड-बारवी डॅम रस्त्यावरील पशेणी गावापुढे तीन किलोमीटर अंतरावर कोळे गाव वसलेलं आहे. मुरबाडपासून हे अंतर केवळ आठ किलोमीटर अंतरावर आहे. कोळे गावात 150 घरं आहेत. शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि नोकरदार यांना दररोज होडीने प्रवास करण्यावाचून पर्याय नाही.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.