Video : दहावी पास झाल्यावर पट्ट्याची दोस्तांनी काढली बैलगाडीतून मिरवणूक, कोल्हापूरात चर्चेचा विषय
राजवर्धन यादव हा दहावीच्या परीक्षेत पास झाल्याचे समजताच. त्याच्या मित्रांनी त्याची मिरवणुक बैलगाडीतून काढण्याचं ठरवलं. त्याला कारणही तसंच आहे. राजवर्धन यादव हा बैलगाडीचा शौकीन असल्यामुळे मित्रांनी मिरवणुकीची तयारी केली.
कोल्हापूर – काल राज्यात दहावी पास (Tenth pass) झालेल्या विद्यार्थ्यांनी (Student) अनोख्या पद्धतीने राज्यात आनंद साजरा केला. दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्याचं समजताचं अनेकांनी ऑनलाईन आपला निकाल पाहिला. त्यानंतर प्रत्येकाने आपल्या पद्धतीने आनंद साजरा केला. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविल्याने पालक वर्गात देखील आनंदाचं वातावरण आहे. काल कोल्हापूरात (Kolhapur) दहावी पास झाल्यावर पट्ट्याची दोस्तांनी बैलगाडीतून मिरवणूक काढल्याने चर्चेचा विषय ठरला होता. ही मिरवणूक गावातून गुलाल उधळीत काढण्यात आली. त्यावेळी त्याचे मित्र देखील सोबत होते. तसेच काही मित्र बाईक मिरवणूकीत सहभागी झाल्याचे व्हिडीओ स्पष्ट दिसत आहे. कालची मिरवणूक संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेची ठरलीय. तसेच मिरवणुकीचा व्हिडीओ अनेकांनी कोल्हापूरात मोबाईल स्टेटसला ठेवल्याची देखील माहिती मिळाली आहे.
राजवर्धन यादवला दहावी परीक्षेत 73 टक्के गुण मिळाले
राजवर्धन यादव हा दहावीच्या परीक्षेत पास झाल्याचे समजताच. त्याच्या मित्रांनी त्याची मिरवणुक बैलगाडीतून काढण्याचं ठरवलं. त्याला कारणही तसंच आहे. राजवर्धन यादव हा बैलगाडीचा शौकीन असल्यामुळे मित्रांनी मिरवणुकीची तयारी केली. राजवर्धन यादवला दहावी परीक्षेत 73 टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे राजवर्धन यादव याला फेटा बांधून मित्रांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली. कोल्हापुरातील कौलव हे राजवर्धनचं गाव आहे. तसेच राजवर्धन शिवमुद्रा कबड्डी संघातील उत्कृष्ट खेळाडू देखील आहे. शिवमुद्रा कबड्डी संघातील त्याचे सहकारी देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते. सध्या बैलगाड्याच्या शर्यती आपण अनेक माध्यमातून पाहत असतो. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग एका वेगळ्या पद्धतीचा तयार झाला आहे. ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत हा विषय सध्या अधिक चर्चीला जात आहे.
कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल
यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के आहे. विशेष म्हणजे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के, तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे.
पुणे – 96.96 नागपूर – 97.00 औरंगाबाद – 96.33 मुबंई – 96.94 कोल्हापूर – 98.50 अमरावती – 96.81 नाशिक – 95.90 लातूर – 97.27
कोकण – 99.27