कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग; खासदार धनंजय महाडिक यांची माहिती; केंद्राकडून मिळाली परवानगी
कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगचा पहिला टप्पा डिसेंबर 2021 मध्येच पूर्ण झाला होता, त्यामुळे डे-नाईट आयएफआय परवाना मिळाला आहे. यामुळे आता 5 मीटर दृश्यमानतेपर्यंतच विमानाचे लँडिंग व टेकऑफ करता येत होते तर आता हा परवाना मिळाल्यामुळे 5 हजार मीटरची मर्यादा 8000 मीटरपर्यंत खाली आली आहे, त्याचा परिणाम म्हणूनच मुसळधार पावसातही विमानसेवा खंडित झाली नव्हती.
नवी दिल्ली: कोल्हापुरातील विमान सेवा (Kolhapur Airlines) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता कोल्हापुरचे विमानतळ चर्चेत आले आहे ते नाईट लँडिंगमुळे. (Night Landing) गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरकर नाईट लँडिंगच्या प्रतिक्षेत होते, आता नागरी विमान महासंचालनालयाकडून मान्यता देण्यात आली असून धावपट्टीच्या विस्तारीकरणालाही केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असल्याचे खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) यांनी सांगितले. कोल्हापूर विमानतळावरील 1 हजार 370 मीटर धावपट्टी 2 हजार 300 मीटरपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. सध्या यापैकी 1 हजार 930 मीटरपर्यंत धावपट्टीचे विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. या विस्तारित झालेल्या धावपट्टीच्या वापरासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसारच डीजीसीएकडून या धावपट्टीचीही पाहणी करून त्याचाही अहवाल सादर करण्यात आला होता. सध्या विस्तारित केलेल्या 1 हजार 930 मीटर धावपट्टीच्या वापरालाही आज मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नाईट लँडिंगसह विस्तारित धावपट्टीचाही वापर आहे.
नाईट लँडिंगसह विस्तारित धावपट्टीलाही मंजूरी
खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रिय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन नाईट लँडिंग, विस्तारित धावपट्टी, अॅप्रन आणि आयसोलेशन बे ला मंजुरी देण्याची मागणी केली होती. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी अॅप्रन आणि आयसोलेशन बे ला मंजुरी दिली, त्यानंतर आज नाईट लँडिंगसह विस्तारित धावपट्टीलाही मंजूरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मुसळधार पावसातही विमानसेवा
कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगचा पहिला टप्पा डिसेंबर 2021 मध्येच पूर्ण झाला होता, त्यामुळे डे-नाईट आयएफआय परवाना मिळाला आहे. यामुळे आता 5 मीटर दृश्यमानतेपर्यंतच विमानाचे लँडिंग व टेकऑफ करता येत होते तर आता हा परवाना मिळाल्यामुळे 5 हजार मीटरची मर्यादा 8000 मीटरपर्यंत खाली आली आहे, त्याचा परिणाम म्हणूनच मुसळधार पावसातही विमानसेवा खंडित झाली नव्हती.
नाईट लँडिंगच्या दुसरा टप्प्यालाही प्रारंभ
मागील जानेवारी महिन्यापासून या विमानतळाच्या नाईट लँडिंगचा दुसरा टप्प्याला प्रारंभ झाला होता, त्यानंतर संपूर्ण बाबींच्या पूर्ततेचा अहवाल मार्च 2022 मध्ये सादर करण्यात आल्यानंतर डीजीसीएकडून अंतिम पाहणी करुन कोल्हापूरचे विमानतळ आता नाईट लँडिंगसाठी आता सज्ज झाले आहे.