अजितदादांकडून मुश्रीफांची उमेदवारी जाहीर होताच कोल्हापुरात समीकरणं बदलली; कुणाला फायदा?

Ajit Pawar Announced Hasan Mushrif Candidacy : कोल्हापूरच्या राजकारणात आता नवी समीकरणं समोर येत आहेत. अजित पवारांनी कागलमध्ये बोलताना हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर कोल्हापुरात वेगळी राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत. वाचा सविस्तर......

अजितदादांकडून मुश्रीफांची उमेदवारी जाहीर होताच कोल्हापुरात समीकरणं बदलली; कुणाला फायदा?
अजित पवार, हसन मुश्रीफImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 10:14 AM

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. अशातच कोल्हापुरात मात्र बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याचा दौरा करत आहेत. नुकतंच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातला भेट दिली. यावेळी कागल विधानसभा मतदारसंघामधून हसन मुश्रीफ निवडणूक लढवतील, असं जाहीर केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा तर होतच आहे, शिवाय महायुतीत मात्र धुसफूस वाढली आहे. जे नेते महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

कागलमध्ये संघर्षपूर्ण लढत

कागलमध्ये कायमच राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. 2019 ला भाजपने समरजित घाटगे यांना तिकीट नाकारलं होतं. मग त्यांनी अपक्ष निवडणूक लढली होती. पण 2019 ला त्यांना यश मिळालं नाही. हसन मुश्रीफ विजयी झाले होते. तेच समरजित घाटगे यंदा विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून तिकिट मिळावं अन् महायुतचे अधिकृत उमेदवार होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र अजित पवारांनी थेट मुश्रीफांचं नाव जाहीर केल्याने कोल्हापुरात मात्र चर्चाच चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

मंडलिक गटाचा कुणाला पाठिंबा?

संजय मंडलिक यांनी कोल्हापुरातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. विधानसभा मतदारसंघात मंडलिक गट हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहणार असल्याचे संकेत माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या बिद्रीतील कार्यक्रमात माजी खासदार संजय मंडलिक यांनी हजेरी लावली. आम्ही महायुतीचा घटक त्यामुळे कोणासोबत राहणार ही सांगण्याची गरज सुद्धा नाही, असं म्हणत संजय मंडलिक यांनी अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आधी ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशातच मंडलिक गटाने देखील हसन मुश्रीफ त्यांना पाठिंबा दिल्यामुळे समरजित घाटगे यांना एकाकी झुंज द्यावी लागणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता येत्या काळात कागल आणि कोल्हापुरात नेमकं काय घडतं? या बदलत्या राजकीय समिकरणांचा कुणाला फायदा होणार? हे पाहावं लागणार आहे.

Non Stop LIVE Update
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.