Kolhapur By Election : ‘तुमच्यात देण्याची दानत नाही, तुम्ही फक्त घरं भरली’, कोल्हापुरातून फडणवीसांचा हल्लाबोल

दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर वैयक्तिक टीका सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी भाजप उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज कोल्हापुरात प्रचारसभा घेतली. त्यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय.

Kolhapur By Election : 'तुमच्यात देण्याची दानत नाही, तुम्ही फक्त घरं भरली', कोल्हापुरातून फडणवीसांचा हल्लाबोल
कोल्हापूरच्या सभेत देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 11:22 PM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील (Kolhapur North Assembly) पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर वैयक्तिक टीका सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी भाजप उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज कोल्हापुरात प्रचारसभा घेतली. त्यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. प्रचारसभे दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सत्यजित कदम अर्थात भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलंय. फडणवीसांच्या उपस्थित पार पडलेल्या सभेला भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम, खासदार संजयकाका पाटील, विनय कोरे, प्रकाश आव्हाडे, हर्षवर्धन पाटील, समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, पृथ्वीराज देशमुख आदी नेते उपस्थित आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवछत्रपतींच्या या भूमीत आल्यावर, ताराराणींचा पुतळा पाहिल्यानंतर मला नेहमीच अभिमान वाटतो. येथे दरवेळी यायचो तेव्हा शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भलेमोठे होर्डिंग दिसायचे. आज हिंदूत्त्वाचे नामोनिशान येथे दिसत नाही, याचे वाईट वाटते, असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावलाय. त्याचबरोबर भगव्याचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात आहे. ही संधी गेली तर पुन्हा येथे भगव्याचे दर्शन होणार नाही, अशा शब्दात फडणवीसांनी मतदारांना साद घातली आहे.

ही लढाई व्यक्तीची नाही, तर विचारांची आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, ज्यांनी 370 रद्द करण्याला विरोध केला, आपल्याला त्यांना परास्त करायचे आहे. यांना तर ‘काश्मीर फाईल्स’ची पण अ‍ॅलर्जी आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी काँग्रेसवर केला. त्याचबरोबर ‘प्राण गेला तरी बेहत्तर, भ्रष्टाचार्‍यांना देऊ भगवं उत्तर’, असा नाराही त्यांनी यावेळी दिलाय. फडणवीस पुढे म्हणाले की, कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न होता, एका झटक्यात आम्ही तो सोडवला. इथल्या पाण्याचा प्रश्न असो की विमानतळाचा, प्रत्येक विषय सोडविला. प्रश्न सोडविणार्‍या व्यक्तीचे नाव आहे, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी.

कोल्हापुरात पूर आला, तेव्हा आम्ही दिलेली मदत आणि तुम्ही दिलेली मदत ही येथील लोकांच्या स्मरणात आहे. तुमच्यात देण्याची दानतच नाही. तुम्ही फक्त घरं भरण्याचे काम केले. गोकूळची निवडणूक होईस्तोवर लॉकडाऊन लागू दिला नाही. निवडणूक होताच लागू केला. त्याकाळात ज्यांचे मृत्यू झाले, त्याचे उत्तर कोण देणार? सारेच्या सारे 100 कोटींच्या वसुलीत मग्न आहेत, अशी जोरदार टीका फडणवीसांनी केलीय.

आज महाराष्ट्रात सरकार नाही, तर केवळ भ्रष्टाचार आहे. सामान्य माणूस होरपळत असताना त्याला कोणतीच मदत दिली नाही. यांना पुळका दारूचा आला. दारु विकणार्‍याला सवलती दिल्या आणि पिणार्‍याला ती खुली करून दिली. पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येक भाजपाशासित राज्याने कमी केले. हे सरकार 52 रुपये प्रतिलिटर आपल्या खिशात टाकतात. पण, भाव कमी करावा वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय. हे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठीच्या निधीत सुद्धा भ्रष्टाचार करते. हे सरकार आहे की सर्कस? असा खोचक सवालही त्यांनी केलाय.

पवारांच्या घरावरील राड्यानंतर जयंत पाटलांचं प्रवीण दरेकरांकडे बोट? कुणाचं नाव घेत नसल्याचंही आवर्जुन सांगितलं!

Gunratna Sadavarte: सुरक्षेत चूक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Raj Thackeray : नितीन गडकरींनी पाठोपाठ रावसाहेब दानवेही राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चा तर युतीचीच होणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.