Kolhapur Election 2022: कोल्हापूर उत्तरसाठी आज मतदान, पुन्हा काँग्रेस मैदान मारणार की यावेळी कमळ फुलणार?
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युनंतर ही जागा रिकामी झाल्याने या जागेवर पुन्हा निवडणूक होत आहे. या जागी काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जयश्री जाधव (Jayshree jadhav), चंद्रकांत जाधवांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी (Kolhapur Election 2022) आज मतदान पार पडत आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. बूथ पुन्हा सज्ज झाले आहेत. आज इथल्या उमेदवरांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युनंतर ही जागा रिकामी झाल्याने या जागेवर पुन्हा निवडणूक होत आहे. या जागी काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जयश्री जाधव (Jayshree jadhav), चंद्रकांत जाधवांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. अनेक मातब्बर नेते या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. चंद्रकांत पाटील भाजपकडून जोर लावत आहेत. काँग्रेसला ही जागा पुन्हा मिळावी यासाठी संतेज पाटील फिल्डिंग लावत आहेत. राज्यभरातील दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरात जाऊन प्रचार केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपर्यंत बडे नेते या प्रचारात उतल्याचे दिसून आले. त्यामुळे ही निवडणूक जास्तच प्रतिष्ठेची झाली आहे.
मतदानासाठी प्रशासन सज्ज
या निवडणुकीसाठी तब्बल 2400 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात 358 कर्मचारी हे राखीव ठेवण्यात आले आहेत, इतर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत असतील. 357 मतदान केंद्रावर 1 हजार 541 ईव्हीएम मसीनची व्यवस्था करण्यात आली आहे. यात 46 अतिरिक्त मतदान केंद्रांसह एकूण 357 केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर 357 बॅलेट युनिट, 357 कंट्रोल युनिट आणि 537 व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 502 बॅलेट युनिट, 502 कंट्रोल युनिट आणि 537 व्हीव्हीपॅट असे एकूण 1 हजार 541 ईव्हीएम वापरले जातील एवढी मोठी तयारी प्रशानाकडून करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी कोल्हापूर महानगर पालिकेच्या बसेसही तैनात करण्यात आल्या आहेत. यात 69 बस आणि 4 जीपचा वापर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मतदानावेळी कडोकोड पोलिसांचा बंदोबस्त
यावेळी कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी आणि मतानावेळी घडणार अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोवस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशानही अलर्ट मोडवर आले आहेत. 181 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार असल्याचाही माहिती यावेळी देण्यात आली आहे. यात अनेक अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. 67 मतदान केंद्रांवर संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग होणार असल्याने ते निवडणूक आयोगालाही पाहता येणार आहे. चार संवेदनशील मतदान केंद्रे आहेत, तेथेही यावेळी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदारांची संख्या किती
या निवडणुकीत पहिल्यांदाच 2 हजार 941 मतदार मतदान करणार आहेत. 2 लाख 91 हजार 566 मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. यात महिलांची संख्याही मोठी आहे. 1 लाख 45 हजार 900 इतक्या महिला मतदार या मतदारसंघात आहेत. 45 हजार 653 पुरुष मतदार असेलला हा मतदारसंघ आहे.या निवडणुकीसाठी कामगारांना भरपगारी सुट्टी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मतदारांना व्होटर स्लिपचे वाटप आधीच वाटप करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांसाठी रिक्षाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
16 एप्रिलला होणार मतमोजणी
आज मतदान पार पडल्यानंतर चार दिवस निकलासाठी वाट पाहवी लागणार आहे.16 एप्रिलला शनिवारी मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी 14 टेबलवर मतमोजणी होईल असे सांगण्यात आले आहे तर मतमोजणीच्या 26 फेर्या होतील, या निवडणुकीचा निकाल वेगाने म्हणजेच दुपारी 12 वाजेपर्यंत लागणार आहे. त्यामुळे शनिवारी इथल्या उमेदवारांचं भवितव्य स्पष्ट होणार आहे. इतर अनेक पक्षाचे व अपक्ष उमेदवार जरी या ठिकाणाहून निवडणूक लढवत असले तरी चुरशीची लढत ही जयश्री जाधव आणि सत्यजीत कदम यांच्यात होणार आहे. त्यामुळे या जागेवर पुन्हा काँग्रेस मैदान मारतं की यावेळी कमळ फुलेले हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.