‘त्या’ व्यक्तीचा फोन आला अन् मधुरिमाराजेंनी माघार घेतली; मविआच्या नेत्याने कारण सांगितलं

Congress Leader on Madhurima Raje Withdraw : काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी काल कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर कोल्हापूरमधील यंदाच्या या निवडणुकीला वेगळं वळण मिळालं. मात्र मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? याचं कारण आता समोर आलं आहे.

'त्या' व्यक्तीचा फोन आला अन् मधुरिमाराजेंनी माघार घेतली; मविआच्या नेत्याने कारण सांगितलं
मधुरिमाराजेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 11:57 AM

उमेदवारी अर्ज मागे घ्यायला अवघी 10- 12 मिनिटं असताना काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा झालेला संताप महाराष्ट्राने पाहिला. पण ऐनवेळी मधुरिमा राजे यांनी माघार का घेतली? याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर कोल्हापूरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी प्रतिक्रिया दिली आहे. काहीही ठरवून झालेलं नाही. राजू लाटकर यांच्या वडिलांचा फोन आला आणि मधुरिमाराजे यांनी माघार घेण्याचं ठरवलं. त्यांचा फोन माघार घ्यायला कारणीभूत ठरलेली आहे, असं सुनील मोदी यांनी सांगितलं.

सुनील मोदी यांनी कारण सांंगितलं

आता कोल्हापूरच्या जनतेला पुरोगामी विचार पटवून देणार आहोत. महाराजांशी आम्ही बोललो तेव्हा ते म्हणाले की चिन्हा पेक्षा विचार महत्वाचा आहे. जर राजू लाटकांना काँग्रेसने पाठिंबा दिला तर स्वत: शाहू महाराज छत्रपतीदेखील प्रचार करताना दिसतील, असंही सुनील मोदी यांनी सांगितलं.

मधुरिमाराजेंनी माघार घेतली तेव्हा काय घडलं?

राजू लाटकर यांच्याशी मी स्वत: बोललो होतो. कोणत्याही परिस्थितीत राजू लाटकर हे माघार घेणार, हेच ठरलं होतं. आम्ही राजू लाटकरांच्या संपर्कात होतो. राजू लाटकर यांना भेटूनी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. ते पावणे तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येणार होते. 2. 35 मिनिटांनंतर सगळं बदललं. मधुरिमा राजे यांना मी देखील विनंती केली होती की तुम्ही माघार घेऊ नका. मी त्यांना थांबवतोय म्हटल्यानंतर महाराज स्वत: आले. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे उमेदवारी मागे घेणं गरजेचं आहे, असं म्हणत त्यांनी मला सुनावलं, असं सुनील मोदींनी म्हटलं.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन करण्यात आलं. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. या बैठकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांनी प्रतिक्रिया दिलाी आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.