“हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” ऋतुराज पाटील यांच्या कानपिचक्या

"त्याला काय हुतंय?" हा शब्दप्रयोग वापरत ऋतुराज पाटील यांनी कोरोनासंबंधी सूचना न पाळणाऱ्या व्यक्तींना कानपिचक्या दिल्या आहेत.

हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय! ऋतुराज पाटील यांच्या कानपिचक्या
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 5:45 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही ‘कोविड योद्धा’ म्हणून जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं आहे. “हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” असा व्हिडीओ शेअर करत ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केलं आहे. “त्याला काय हुतंय?” हा शब्दप्रयोग वापरत ऋतुराज यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. (Kolhapur Congress MLA Ruturaj Patil appeals to follow guidelines to prevent Corona)

“कोरोनाच्या संकटाशी गेले पाच महिने आपण सामना करत आहोत. सुरुवातीला परदेशात, मुंबई, पुण्यात असणारा कोरोना आपल्या शहरात, गावात, गल्लीत नाही, तर दारात येऊन पोहचला आहे. शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस, एनजीओ आपल्या संरक्षणासाठी काम करत आहेत, रात्रीचा दिवस करत आहेत. परंतु सध्या कम्युनिटी स्प्रेड झाल्यासारखी स्थिती आहे. एकीकडे बरे होणारे रुग्ण आहेत, तर कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आपण स्वत:ची काळजी घ्यायला हवीच, पण कुटुंब आणि इतरांची काळजी घेण्याचीही वेळ आली आहे. आपणच कोरोना योद्धा व्हायचं आहे. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही.” असे ऋतुराज पाटील म्हणाले.

“रस्ते, मार्केट, मेडिकल शॉप, दुकाने, बेकरी अशा अनेक ठिकाणी आजही गर्दी असल्याचं चित्र आहे. आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळतो का? मित्रांसोबत एकत्र बसतो. वाटतं आपलेच तर मित्र आहेत. त्याला काय हुतंय? ऑफिसमध्ये गर्दी करुन एकत्र जेवायला बसतो. त्याला काय हुतंय? गल्लीच्या कोपऱ्यावर तासंतास गप्पा मारत बसतो आणि म्हणतो हे काय लांबचे आहेत का? त्याला काय हुतंय? आपल्या माता भगिनी दारात बसतात, ओपन मैदाने आणि ओपन जिमची परवानगी मिळाल्याने एकत्र जमून खेळतो. त्याला काय हुतंय? हे ठरलेले वाक्य.” असे म्हणत ऋतुराज पाटील यांनी कान टोचले आहेत. “हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय, कोरोनाला तटवायचंच” असा नाराही त्यांनी दिला. (Kolhapur Congress MLA Ruturaj Patil appeals to follow guidelines to prevent Corona)

संबंधित बातमी :

युवा आमदार ऋतुराज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी

(Kolhapur Congress MLA Ruturaj Patil appeals to follow guidelines to prevent Corona)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.