कोरोना काळात हसन मुश्रीफांनी बहिणीसह जवळचे 4 नातेवाईक गमावले, नागरिकांना महत्वाचं आवाहन

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही कोरोनामुळे मोठ्या बहिणीसह जवळच्या 4 नातेवाईकांना गमावलं आहे. मुश्रीफ यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

कोरोना काळात हसन मुश्रीफांनी बहिणीसह जवळचे 4 नातेवाईक गमावले, नागरिकांना महत्वाचं आवाहन
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 10:15 PM

कोल्हापूर : कोरोना संकटात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, रोजगार हिरावला गेला, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. तर अनेकांनी आपल्या स्वकियांना गमावलं. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही कोरोनामुळे मोठ्या बहिणीसह जवळच्या 4 नातेवाईकांना गमावलं आहे. मुश्रीफ यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. आपल्या स्वकियांच्या निधनाबाबत माहिती देताना मुश्रीफ यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. (Rural Development Minister Hasan Mushrif’s sister passes away)

“माझी व माजी आय.जी. श्री. एस. एम. मुश्रीफ यांच्या ज्येष्ठ भगीनी श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर रा.कोल्हापूर (वय- ७८) या शनिवारी (आठ मे रोजी) पैगंबरवासी झाल्या. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ॲस्टर आधार दवाखान्यामध्ये दाखल केले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमची जेष्ठ बहिणीच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करुन कोवीड पहिली व दुस-या लाटेत ज्येष्ठ बहिण, लहान बहिणीचे पति (मेव्हणे), भाचीचा पती, मामाचा मुलगा (मिरज ) यांना गमावल्याबाबत दुःख आहे. दुसरी लाट ही भयंकर असून कृपया कोणीही सांत्वनासाठी येऊ नये. कडक लाॅकडाऊन व कोरोना संसर्गाची भीती आहे”, असं ट्वीट मुश्रीफ यांनी केलंय.

कोल्हापुरात लॉकडाऊनची शक्यता

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी काही गंभीर बाबी दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे 2 दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. कोल्हापुरात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढतेय. तसंच तरुण मुलांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे 10 ते 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल असे संकेत मुश्रीफ यांनि दिले आहेत.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

जालन्यात आता लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट; राजेश टोपेंचे आदेश

Rural Development Minister Hasan Mushrif’s sister passes away

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.