कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला पहाटे भीषण आग, दोघा रुग्णांच्या मृत्यूची भीती

कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. (Kolhapur CP Hospital Get fire)

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला पहाटे भीषण आग, दोघा रुग्णांच्या मृत्यूची भीती
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 10:19 AM

कोल्हापूर : कोल्हापुरातील सिपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला भीषण आग लागली आहे. या आगीत दोन रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Kolhapur CP Hospital Get fire)

कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सीपीआरच्या या विभागात कोरोनाच्या अतिगंभीर 15 रुग्णांवर उपचार सुरू होते.

ही आग लागल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांनी इथल्या कोरोना रुग्णांना अपघात विभागात हलवलं. मात्र यात  या घटनेचेमहाराष्ट्र सुरक्षा बलाच्या 2 कर्मचाऱ्यांना इजा झाल्याच प्रत्यक्षदर्शीनी सांगितल आहे.

या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं सांगितल आहे.

नेहमी वर्दळ असलेल्या या रुग्णालयातील एका महत्त्वाच्या विभागाला अशा पद्धतीने आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सिपीआरला भेट देत माहिती घेतली. (Kolhapur CP Hospital Get fire)

संबंधित बातम्या : 

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, एपीएमसी मार्केटमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केटमध्ये भरारी पथक तैनात

सेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.