कोल्हापुरातील हिडीस डान्स पडला महागात; माजी नगरसेवकावर गुन्हा; 20 जणांना होणार अटक

कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील तालीम मंडळाने देवीचा जग आणण्याची प्रथा असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमानंतर डॉल्बी लावून मिरवणूक काढण्यात येत होती, त्यावेळी डॉल्बीच्या ठेक्यावर तृत्तीयपंथीयांनी सिगारेट ओढत डान्स करत धिंगाणा घातला होता.

कोल्हापुरातील हिडीस डान्स पडला महागात; माजी नगरसेवकावर गुन्हा; 20 जणांना होणार अटक
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 11:16 AM

कोल्हापूर: ज्या कोल्हापुरला शाहूनगरी म्हणून ओळखले जाते त्या पुरोगामी कोल्हापुरात धार्मिक कार्यक्रमाच्या  नावाखाली तृतीयपंथीयांचा सिगारेट ओढत डॉल्बीच्या (Kolhapur Dolby Dance) ठेक्यावर हिडीस प्रकारचा धिंगाणा घालतानाचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला. त्यानंतर कोल्हापुरातील या प्रकारावर जोरदार टीका करण्यात आली. शुक्रवार पेठेत हा प्रकार घडल्याने त्यानंतर शिवसेना आक्रमक होत आयोजकांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रकरणी माजी नगरसेवकांसह 20 जणांवर गुन्हा (Crime Record) दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर हा हिडीस प्रकार घडल्याने आयोजकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.

कोल्हापुरातील कालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियासह नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत आयोजकांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.

माजी नगरसेवकासह 20 जणांवर गुन्हा

या हिडीस डान्सप्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश आनंदराव गवंडी (वय 50, रा. डी. मस्कुती तलाव, शुक्रवार पेठ), राकेश रंगराव पोवार (37, शुक्रवार पेठ), सलमान रियाज बागवान, नितीन बाळासाहेब साळी, किरण प्रकाश साठम (37, शुक्रवार पेठ) यांच्यासह इतर 10 व चार ते पाच अनोळखी तृतीयपंथीयांचा समावेश आहे. संशयितांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे लक्ष्मपुरीचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले आहे.

धार्मिकतेच्या नावाखाली हिडीस प्रकार

धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली काल कोल्हापुरात तृतीयपंथीयांनी सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर धिंगाणा घातला होता. देवीचा जग आणण्याच्या मिरवणुकीत हा किळसवाणा प्रकार घडल्याने कोल्हापुरातून प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर शहरातील शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आयोजकांवर गुन्हा नोंद करा अन्यथा आंदोलन करू असा पवित्रा घेतला गेल्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृत्तीयपंथीयांचा सिगारेट ओढत डान्स

कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील तालीम मंडळाने देवीचा जग आणण्याची प्रथा असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमानंतर डॉल्बी लावून मिरवणूक काढण्यात येत होती, त्यावेळी डॉल्बीच्या ठेक्यावर तृत्तीयपंथीयांनी सिगारेट ओढत डान्स करत धिंगाणा घातला होता. ज्या ठिकाणी धिंगाणा सुरू होता, त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे फोटो लावलेले पोस्टर होते, त्यामुळे कोल्हापुरकर संतप्त होत, त्यांनी आयोजकांव गुन्हा नोंद करण्याची मागणी काल केली होती. त्यानंतर आज लक्ष्मीपुरी पोलीस स्थानकात एका माजी नगरसेवकासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.