ईडीकडून 30 तास चौकशी, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ हे संचालक असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची माहिती समोर आलीय.

ईडीकडून 30 तास चौकशी, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा झटका
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 5:55 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे संचालक असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (Kolhapur District Bank) कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याची नुकतीच ईडीकडून (ED) तब्बल 30 तास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीमुळे हा कर्मचारी तणावात होता, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, संबंधित कर्मचारी आज बँकेत काम करत असताना या कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित कर्मचाऱ्याचं नाव सुनील लाड असं आहे. ते जिल्हा मध्यवर्ती बँके वैयक्तिक कर्ज विभागातील व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी नुकतीच त्यांची कसून चौकशी केली होती. त्यानंतर आज ते बँकेत आले असता त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील लाड यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील लाड यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. डॉक्टर त्यांना धोक्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत आहेत.

हे सुद्धा वाचा

ईडीकडून जिल्हा बँकेत झाडाझडती

कोल्हापूर जिल्हा बँकेची (Kolhapur District Bank) दोन दिवसांपासून ईडीकडून (ED) झाडाझडती सुरु होती. विशेष म्हणजे ईडीने जिल्हा बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते.

ईडीकडून काल हसन मुश्रीफ यांच्या बँक खात्याशी संबंधित चौकशी करण्यात आली होती. त्यासाठी ईडीकडून जिल्हा बँकेत दोन वेळा धाड टाकण्यात आली. या दरम्यान, ईडीकडून बँक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर ईडीने जिल्हा बँकेच्या पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं.

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून ईडी कारवाईविरोधात आंदोलन

ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात जिल्हा बँकेचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ईडीविरोधात थेट आंदोलन पुकारलं आहे. कर्मचाऱ्यांकडून निषेध आंदोलन करण्यात येतंय.

हसन मुश्रीफ बँकेत असतानाच कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा झटका

बँकेचे कर्मचारी सुनील लाड यांना आज जेव्हा बँकेत काम करत असताना हृतद विकाराचा तीव्र झटका आला तेव्हा हसन मुश्रीफ हे स्वत: त्यावेळी बँकेत उपस्थित होते. सुनील यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण या घटनेमुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.