‘या’ बँकेनेच दिला ईडीला दणका, अधिकाऱ्यांसह ईडी कर्मचाऱ्यांवर थेट पोलिसात तक्रार
ईडीच्या अधिकाऱ्यांनी अमानुषपणे चौकशी सुरू ठेवली गेल्याने त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना झाला आहे. त्यामुळे आता या ईडी कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचारी संघाने इशारा दिला आहे.
कोल्हापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह ईडीकडून बँक कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक चर्चेत आली आहे. 1 जानेवारी रोजी ईडीने केडीसी बँकेच्या वेगवेगळ्या शाखांवर धाड टाकली होती. त्यानंतर आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह बँकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले मात्र त्याचवेळी ईडीकडून अमानुषपणे सुरु केलेल्या चौकशीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन बँकेच्या एका कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता.
त्यामुळे आता ईडी कारवाई दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या वागणुकीविरोधात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचारी संघटनेने पोलिसात धाव घेतली आहे.
कर्मचाऱ्यांची अमानुष पद्धतीने चौकशी करण्यात येत असल्याने ईडीचे सहाय्यक संचालक रत्नेश कुमार कर्ण यांच्यासह 22 जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आी आहे.
त्यामुळे आता पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक चर्चेत आली आहे. थेट ईडी कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने राज्यभर या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीकडून १ कडून दोन शाखांवर छापे टाकले होते. ईडीकडून ही धाड टाकल्यानंतर त्य अधिकाऱ्यांना लागणारी सगळी माहिती बँकेचे कर्मचारी त्यांना देत होते.
मात्र चौकशीच्या नावाखाली या अधिकाऱ्यांकडून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच ईडीच्या सहाय्यक संचालकासह 22 जणांसह पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून घेतले. त्यांचा बाहेरच्या लोकांशी कोणाचाही संपर्कच होऊ दिला नाही.
कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, सलग तीस तास चौकशी लावल्याने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांना या अधिकाऱ्यांनी झोपू दिले नाही.
तसेच चौकशीसाठी आत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार ईडी अधिकाऱ्यांनी केल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास झाला. त्यामुळेच त्यांच्यातील एका कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या या त्रासला कंटाळूनच कोल्हापूर मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ईडी कर्मचाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, चौकशीच्या नावाखाली दमदाटी करण्यात आली आहे असा थेट आरोपच ईडीच्या अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी संघटनेने केली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी अमानुषपणे चौकशी सुरू ठेवली गेल्याने त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना झाला आहे. त्यामुळे आता या ईडी कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचारी संघाने इशारा दिला आहे.