Kolhapur Election Result 2022 : काही तासात निकाल हाती, उत्तर कोल्हापुरात “पंजा कसणार की कमळ” फुलणार?

जयश्री जाधव (Jayashree jadhav) विरुद्ध सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) अशा होणाऱ्या या निवडणुकीत दोन नेत्यांची प्रतीष्ठ पणाला लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही जागा भाजपच्या गोटात यावी यासाठी पूर्ण जोर लावत आहेत. तर दुसरीकडून सतेज पाटील कोल्हापूर उत्तरचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Kolhapur Election Result 2022 : काही तासात निकाल हाती, उत्तर कोल्हापुरात पंजा कसणार की कमळ फुलणार?
कोल्हापूर उत्तर मतदार संघाचा आज निकालImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 8:35 AM

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर उत्तर मतदारसंघाने (Kolhpaur North Assembly Polls) राजकारणाचा पारा वाढवला होता. आज त्यात मतदारसंघाचा निकाल आहे. जयश्री जाधव (Jayashree jadhav) विरुद्ध सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) अशा होणाऱ्या या निवडणुकीत दोन नेत्यांची प्रतीष्ठ पणाला लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही जागा भाजपच्या गोटात यावी यासाठी पूर्ण जोर लावत आहेत. तर दुसरीकडून कोल्हापूर उत्तरचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी सतेज पाटील प्रयत्न करत आहेत. राजाराम तलावा शेजारील शासकीय गोदामात ही मतमोजणी पार पडत आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासातच निकालाचे चित्र स्पष्ट होईल. 16 टेबल आणि 26 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडत आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिलला मतदान पार पडलं होतं. आज कोल्हापूरकरांना या बहुचर्चित जागेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

काही तासात चित्र स्पष्ट

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवार, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडलं होतं. जवळपास 61.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यासह 15 उमेदवार नशीब आजमावत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. 14 टेबलांवर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू होईल. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होतील. यानंतर उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढून पाच ईव्हीएम निवडले जातील आणि त्या मशिनच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत.

उत्तर कोल्हापूर कुणाचं?

दिवंगत नेते चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या जागेसाठी ही पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना या जागेवर तिकीट देण्यात आले आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या गोटातून या जागेसाठी पूर्ण ताकद लावण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांपासून सर्वच नेत्यांनी कोल्हापुरात जोरदार प्रचार केला आहे. तर भाजकडून फडणवीसांपासून ते चंद्रकांत पाटलांपर्यंत नेते कोल्हापुरात तळ ठोकून बसले आहेत.

Shivsena on MNS: मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’चे पठण करण्याचे नवे हिंदुत्व काही जणांनी जन्मास घातलंय, शिवसेनेची मनसेसह संघावरही टीका

कसा आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ; आजवर कुठल्या पठ्ठ्यानं गाजवलं कोल्हापूर उत्तरचं मैदान?

पाच कारणं ज्याच्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक महत्त्वाची आहे; वाचा ग्राऊंड रिपोर्ट

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.