गोकुळ निवडणूक : पी.एन. पाटलांचा बंटींना, तर अरुण डोंगळेंचा महाडिकांना धक्का

ठराव जमा करण्यासाठी सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे.

गोकुळ निवडणूक : पी.एन. पाटलांचा बंटींना, तर अरुण डोंगळेंचा महाडिकांना धक्का
Follow us
| Updated on: Jan 20, 2020 | 6:36 PM

कोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे ठराव जमा करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत (Gokul Elections). त्यामुळे आज एका बाजूला काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांच्या साथीने सत्ताधारी महाडिक गटाने एकत्रितपणे ठराव जमा करण्याचा चंग बांधला असताना, त्याला काही विद्यमान सदस्यांनी खिंडार पाडलं (Gokul Elections). तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनीही सत्ताधारी गटासोबत जात पालकमंत्री सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला. ठराव जमा करण्यासाठी सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे (Gokul Elections).

कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सत्ताधारी महादेवराव महाडिक आणि काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाने आज सोमवारी (20 जानेवारी) सहाय्यक दुग्ध निबंधकांकडे एकत्रितपणे ठराव जमा करत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला सत्ताधारी गटातीलच सदस्यांनी खिंडार पाडलं. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे विश्वास पाटील आणि शशिकांत पाटील सुरेकर यांनी आपल्या गटाचा स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने आज अनेकांच्या भुवया उंचावल्या. आपल्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत या तिघांनी गुगली टाकली.

सत्ताधारी संचालक मंडळातील तिघांनी बंड पुकारल्यानंतरही आमदार पी.एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात ठराव एकत्र जमा करून घेतले. बंड पुकारलेल्या संचालकांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करू असा विश्वास यावेळी माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी व्यक्त केला.

विधानसभेनंतर आमचं ठरलंय, आता फक्त गोकुळ उरलंय, अस म्हणत महाडिक गटाचे कट्टर विरोधक पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत गोकुळ काबीज करण्यासाठी चंग बांधला आहे. यात त्यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांचीही साथ मिळणार हे उघड आहे. त्यामुळे आधीच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या पी एन पाटील यांनी पुन्हा एकदा गोकुळच्या सत्ताधारी गटासोबत जात सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेणार असल्याचं सांगत पी. एन. पाटील यांनी या राजकारणाला नवे वळण दिलं आहे.

गोकुळचे ठराव जमा करण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. पालकमंत्री सतेज पाटील एकत्रितपणे आपले ठराव दुग्ध निबंधकांकडे देणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार पी. एन. पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनाला सतेज पाटील कितपत प्रतिसाद देतात. त्याचबरोबर बंड पुकारलेले सत्ताधारी संचालक कोणाच्या बाजूने उभे राहतात, याची उत्सुकता आता जिल्ह्याला लागली आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.