नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणं म्हणजे देशाला…; हसन मुश्रीफांकडून तोंड भरून कौतुक

Hasan Mushrif on Narendra Modi Sabha : मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. आज मोदींची कोल्हापुरात सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले? वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणं म्हणजे देशाला...; हसन मुश्रीफांकडून तोंड भरून कौतुक
Kolhapur Hasan Mushrif on Narendra Modi Latest Marathi News
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 4:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरातील तपोवन मैदानावर जाहीर सभा होत आहे. तपोवन मैदानावर सभेची तयारी पूर्ण झाली आहे. पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी येणार आहेत. दहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये येणार आहे. या सभेआधी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. देशाची प्रगती पाहिली आणि देश महासत्तेकडे चालला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे म्हणजे देशाला महासत्तेकडे नेण्यासारखा आहे, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.

हसन मुश्रीफ म्हणाले…

2 जुलै 2023 ला आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि पाच तारखेला आमचा मेळावा झाला. या मेळाव्यात स्वतः अजित दादांनी या सगळ्या गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे यांनी व्हीडिओ दाखवतो म्हणाले असतील तर निश्चितपणे त्यांच्याकडे पुरावे असतील. या गोष्टी अनेक वेळा झाल्या होत्या हे सत्य आहे. धनंजय मुंडे यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये तथ्य आहे आणि याचा उहापोह या अगोदर अनेकदा झाला आहे, असं मुश्रीफ म्हणालेत.

हा तर महाराजांचा अपमान- हसन मुश्रीफ

शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभा करून महाविकास आघाडीने अपमान केला अशा पद्धतीची टीका हसन मुश्रीफ यांनी केली. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूरच्या सभेवर टीका केल्यानंतर त्याला असं मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीला शाहू महाराजांचा सन्मान राखायचा होता तर राज्यसभा का दिली नाही? असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे. शिवाय मान गादीला आणि मत मोदीला असं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा होत आहे. या सभेला महायुतीच्या सर्व मित्र पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत. दहा वर्षांनंतर नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा होत आहे. या सभेत मोदी काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. या सभेच्या आधी हसन मुश्रीफ यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.