Kolhapur bomb | गावठी बॉम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न, मोठा अनर्थ टळला

गावठी बाँम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरात घडला आहे. (kolhapur jaisinghpur bomb)

Kolhapur bomb | गावठी बॉम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न, मोठा अनर्थ टळला
पोलिसांनी अशा प्रकारे गावठी बॉम्ब निकामी केला.
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 6:08 PM

कोल्हापूर : गावठी बाँम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरात घडला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हा गावठी बॉम्ब (Jaisinghpur bomb) निकामी केला आहे. (Kolhapur Jaisinghpur bomb has been disposed by police)

मिळालेल्या माहितीनुसार जिह्यातील जयसिंगूर शहरात एक रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी अज्ञाताने रुग्णालयाच्या परिसरात गावठी बॉम्ब प्लान्ट केला होता. याच परिसरात विस्फोटासाठी लागणारं पुरक साहित्य दोन दिवसांपासून एका गोणीमध्ये पडून होतं. रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला.

पोलिसांना बॉम्ब निकामी केला

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांना सूत्र हालवले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी गावठी बॉम्ब निकामी केला. पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, जयसिंगपूरसारख्या शहरात गावठी बॉम्बच्या मदतीने थेट रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून तापसातून लकवरच या प्रकरणाशी निगडीत बाबी समोर येतील असे सांगितले जात आहे.

जिलेटीन कांड्या आढळल्यानं खळबळ

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल पंचवीस किलो जिलेटिनच्या कांड्या पोलिसांनी 19 मार्च रोजी जप्त केल्या होत्या. त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले होते. या प्रकरणाने संपूर्ण अमरावतीसुद्धा जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती. जिलेटिन आणि डिटोनेटरचा वापर नेमका कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यामुळे करण्यात येत होता, याचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. मात्र, या प्रकरणा ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली असून एक आरोपी फरार आहे.

इतर बातम्या :

धक्कादायक..अमरावतीमध्ये जिलेटीनच्या 200 कांड्या आढळल्यानं खळबळ, एकाला अटक

विखे पाटलांच्या कट्टर समर्थकाची भाजपला सोडचिठ्ठी, पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

(Kolhapur Jaisinghpur bomb has been disposed by police)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.