Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी फडणवीसांशी भेट, आता कोल्हापूरच्या अपक्ष आमदाराचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा

राज्य सरकार वस्त्रोद्योग वाचवण्यासाठी काही करेल असे वाटत नाही, असं म्हणत आमदार प्रकाश आवाडेंनी आंदोलनाचा इशारा दिला

आधी फडणवीसांशी भेट, आता कोल्हापूरच्या अपक्ष आमदाराचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा
देवेंद्र फडणवीस, प्रकाश आवाडे, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 1:01 PM

इचलकरंजी : वस्त्रोद्योगासह लघु उद्योगाचे प्रलंबित प्रश्न ठाकरे सरकारने 15 जानेवारीपर्यंत मार्गी लावावेत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल, असा इशारा इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Avade) यांनी दिला. प्रकाश आवाडे यांनी आज इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनमध्ये शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलवली होती. वस्त्रोद्योगाला भेडसावणार्‍या समस्या आणि निर्माण होत असलेल्या अडचणींसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासह मंजूर योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित होती. दोनच दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हापुरात आवाडे कुटुंबाची भेट घेतली होती. (Kolhapur MLA Prakasha Avade warns Thackeray govt of protest)

“आपण आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळोवेळी पत्राद्वारे वा प्रत्यक्ष भेटून वस्त्रोद्योगाच्या समस्या सांगितल्या आहेत. त्यावर बैठक घेण्याचे केवळ आश्वासन दिले जाते, मात्र बैठक घेतली जात नसल्याने आता राज्य सरकार हा उद्योग वाचवण्यासाठी काही करेल असे वाटत नाही” असं आवाडे यावेळी म्हणाले.

“एकजुटीने लढ्यात सहभागी व्हा”

“मागील पाच वर्षांपासून संपूर्ण वस्त्रोद्योग आर्थिक संकटातून जात आहे. चार वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने वीज दरात सवलतीसह विविध योजना जाहीर केल्या होत्या. परंतु आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विद्यमान सरकारकडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या असतील तर केवळ चर्चा न करता सर्वांनी एकजुटीने लढ्यात सहभागी व्हायले पाहिजे” असे आवाडेंनी यावेळी सांगितले.

दोन यंत्रमागधारकांच्या आत्महत्येने खळबळ

इचलकरंजी शहरातील यंत्रमागधारकांनी वस्त्रोद्योगाच्या समस्यांचा उहापोह करत संपूर्ण वस्त्रोद्योगाला आज विविध संकटांनी घेरल्याचे मान्य केले. शासनाकडूनही जाहीर योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने वस्त्रोद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आठवडाभरात शहरातील अमर डोंगरे आणि महेश जावळे या दोन यंत्रमागधारकांनी आत्महत्या केल्याने यंत्रमाग व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्वच विषयासंदर्भात माहिती देऊन वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी मिळण्यासाठी पुढाकार घेऊन पाठबळ द्यावे अशी मागणी केली.

बैठकीत वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, सतीश कोष्टी, नगरसेवक सागर चाळके, सुनिल पाटील, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश सातपुते, प्रकाश मोरे, विनय महाजन, पांडुरंग धोंडपुडे, दीपक राशिनकर, राजगोंड पाटील, सुनील पाटील, दत्तत्रय कनोजे, विश्वनाथ मेटे, प्रकाश मोरे, यांच्यासह यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी आणि कारखानदार उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या सत्ताकाळात मंत्रिपद, कोल्हापुरातील दिग्गज नेत्याच्या भेटीला फडणवीस

काँग्रेसच्या बडे नेते कल्लाप्पाण्णा आवाडेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

(Kolhapur MLA Prakasha Avade warns Thackeray govt of protest)

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.