कोल्हापूर : नियती किती निष्ठूर, हातातोंडाशी आलेली दोन्ही मुले गमावली, आईला रक्षाविसर्जनालाच हदयविकाराचा तीव्र झटका…

नंदा यांचे पती, सून आणि एक वर्षांची नात यांचे दु:ख कधीही न भरणारे आहे. नंदाताई पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील कुटुंबांविषयी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तसेच वीजमंडळाच्या काराभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापूर : नियती किती निष्ठूर, हातातोंडाशी आलेली दोन्ही मुले गमावली, आईला रक्षाविसर्जनालाच हदयविकाराचा तीव्र झटका...
प्रातिनिधीक छायाचित्र Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 6:27 PM

राज्यात दोन्ही सख्ख्या भावांचा वीजेचा जबर धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूरातील शाहुवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे घडली होती. रविवारी या दोघा तरुण मुलांचा झालेला असा मृत्यू पाहून रक्षा विसर्जनाच्या वेळी त्यांच्या वृद्ध आईने देखील आपले प्राण सोडल्याचे उघडकीस आले आहे. शाहूवाडीतील कोपार्डे येथे अति उच्च भाराच्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने सुहास आणि कृष्णा पाटील या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या वृद्ध आईला दोन्ही मुलांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कोपार्डे गावातील कडवी नदीजवळील शेतात सुहास कृष्णा पाटील ( 36) आणि स्वप्नील कृष्णा पाटील ( 31) हे दोघे भाऊ भात रोपणीकरुन दुपारी तणनाशक फवारणीसाठी शेताकडे गेले होते. त्यावेळी त्यांचा स्पर्श वीजेच्या तारांना होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. बुधवारी शेतातील पिकांवर तणनाशक फवारण्यासाठी सुहास कृष्णा पाटील आणि स्वप्नील कृष्णा पाटील हे दोघे भाऊ बुधवारी दुपारी शेताकडे गेले होते. त्यावेळी तणनाशक फवारताना सुहासला वीजेच्या उघड्या तारांचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला. त्यावेळी त्याचा भाऊ दादाला काय अचानक झाले म्हणून धावत गेला असता.त्यालाही उघड्या वीजेच्या तारांतून वीजप्रवाह शरीरात जाऊन तोही शेतात निपचित पडला. आपली दोन्ही मुले शेतातून घरी का आली नाही म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील शेतावर गेले. त्यांनी मुलांना असे निपचित पडलेले पाहीले आणि त्यांच्यावर आभाळ कोसळलं. दोन्ही हातातोंडाशी आलेली मुले अशा प्रकारे गमावल्याने दोघे पालक दु:खाच्या सागरात बुडाले. मुलांची आई हे दु:ख सहन करु शकली नाही. सुहास याची पत्नी देखील दु:खाच्या सागरात बुडाली.

पाटील कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

दोन्ही मुलांना कष्ट करुन वाढविले आणि आता सुखाचे दिवस सुरु होणार इतक्यात काळाचा घाला झाला. दोन्ही कमावत्या मुलांना गमावल्याने वृद्धापकाळातील हा आघात सहन झाल्याने नंदा कृष्णा पाटील यांना शनिवारी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने दवाखान्यात नेले. मात्र मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. दोन मुले, पत्नी यांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नंदा यांचे पती, सून आणि एक वर्षांची नात यांचे दु:ख कधीही न मिठणारे आहे.नंदाताई पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील कुटुंबांविषयी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तसेच वीजमंडळाच्या काराभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.