बंटी-मुश्रीफांनी करुन दाखवलं, कोल्हापुरात आघाडीचाच महापौर

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजप-ताराराणी आघाडीला धूळ चारत, महापौरपद टिकवलं आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांची निवड झाली आहे. त्यांनी  भाजपा – ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा पराभव केला. त्यामुळे काॅग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी करुन दाखवत, भाजप नेते आणि पालकमंत्री […]

बंटी-मुश्रीफांनी करुन दाखवलं, कोल्हापुरात आघाडीचाच महापौर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजप-ताराराणी आघाडीला धूळ चारत, महापौरपद टिकवलं आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांची निवड झाली आहे. त्यांनी  भाजपा – ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा पराभव केला. त्यामुळे काॅग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी करुन दाखवत, भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आकड्यांच्या राजकारणाला धक्का दिला.

नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आज महापौर-उपमहापौर निवडणूक झाली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर भाजपने तांत्रिकदृष्ट्या तगडं आव्हान दिलं होतं. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने पाच नगरसेवक अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरु होती. तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पक्षांतर बंदीच्या कायद्यांतर्गत अपात्र झाले होते. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी होताना दिसत होतं. महापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे रिंगणात होत्या, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव यांना मैदानात उतरवण्यात आलं . मात्र पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश आजच येण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली होती. कारण या पाच नगरसेवकांमध्ये 4 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आणि एक भाजपचा होता.

पाच नगरसेवक अपात्र ठरले असते तर  भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 4 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज असती. दुसरीकडे शिवसेनेचे 4 नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौरपद भाजपकडे खेचण्यासाठी शड्डू ठोकला असला, तरी भाजपसाठी ही लढाई तितकीशी सोपी नव्हती. पण भाजपने मंत्रालयातून ताकद लावल्याचा आरोप होत आहे. सध्या महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्ता आहे.

सध्या कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी 44 तर भाजप-ताराराणी आघाडीचे 33, आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. मात्र अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे सर्व पक्षांचं गणित बिघडणार आहे.

कोल्हापूर महापालिका एकूण जागा – 81

*काँग्रेस-राष्ट्रवादी – 44, दोन अपात्र (राष्ट्रवादी) – 42, चार अपात्र ठरल्यास  – 38

*भाजप-ताराराणी – 33, एक अपात्र ठरल्यास – 32

*शिवसेना – 4 तटस्थ राहणार आहेत.

* त्यामुळे उर्वरित 77 जागांपैकी 36 जागा जो कोणी जिंकेल त्याचा महापौर होईल.

राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची पदे रद्द झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ 42 झाले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने कारवाई झाल्यास आणखी चार नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. त्यामुळे संख्याबळ 38 वर येईल. याच कारणास्तव भाजपच्या एका नगरसेवकाचे पद रद्द झाल्यास भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक 32 होतील. जर जात पडताळणी प्रमाणपत्रावरून नगरसेवकांवर कारवाई झालीच नाही, तर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित होण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात तब्बल नऊ नगरसेवकांचा फरक असेल.

कोल्हापुरात सत्तासंघर्ष

आज होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपद निवडणुकीत सरकार आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिठासन अधिकाऱ्यांना हाताशी धरून अपात्र नगरसेवकांचा मुद्दा पुढे करून त्यांना मतदानापासून रोखले तर कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याला सर्वस्वी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असतील असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला होता. कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मी नाही तर मुश्रीफच जबाबदार असतील असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना दिलं. पालिकेत भाजपचा महापौर व्हावा अशी इच्छा आहे पण त्यात काम करणारी दुसरी माणसं आहेत. मी पालिकेत लक्ष घालत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर महानगरपालिका महापौर निवडणूक

काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी एकूण 44 नगरसेवक ( काँग्रेस 27, राष्ट्रवादी 15, अपक्ष 2 )

भाजप ताराराणी आघाडी एकूण नगरसेवक 33 ( भाजप 13, ताराराणी 19, अपक्ष 1)

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे आधीच 2 नगरसेवक अपात्र झालेत, आता पुन्हा 4 नगरसेवक अपात्र झाल्यास सदस्य संख्या 38 वर येईल

शिवाय अश्विनी रामाने यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यांना मतदानास मज्जाव केल्यास काँग्रेस राष्ट्रवादीची संख्या 37 होऊ शकते

भाजप ताराराणी आघाडीतील एक नगरसेवक अपात्र झाल्यास त्यांची सदस्य संख्या 32 होईल

शिवसेनेचे 4 नगरसेवक तटस्थ राहणार

भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 4 नगरसेवकांची गरज भासेल

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.