पहाटे ईडीने आमदाराच्या घरावर धाड टाकली, ही गोष्ट समर्थकांना समजताच काय केलं ते तरी पाहा…

श्रावणबाळ अशी जनसामान्यामध्ये ओळख असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून दुसऱ्यांदा कारवाई केल्यामुळे आता कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले आहे. आपल्या नेत्यावर कारवाई होताच कार्यकर्त्यांनी आगळ्यावेगळ्या आंदोलनांनी लक्ष वेधून घेतले आहे.

पहाटे ईडीने आमदाराच्या घरावर धाड टाकली, ही गोष्ट समर्थकांना समजताच काय केलं ते तरी पाहा...
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 2:29 PM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कागल तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आज दुसऱ्यांदा ईडीचे धाड पडली. आमदार हसन मुश्रीफ यांची जनसामान्यामध्ये श्रावणबाळ अशी ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांचा नेता म्हणून ओळख असल्याने ईडीन धाड टाकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून उतरून या कारवाईविरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या.

हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर येथील संताजी घोरपडे साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

त्या कारणावरूनच त्यांची त्यांच्या घरावरही दुसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे. तर कोलकाता येथील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटी रुपयांची घोटाळा केल्याचा संशयही व्यक्त केला जातो आहे. त्यामुळेय त्यांच्यावर दुसऱ्यांदा ईडीने धाड टाकली आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर पहाटे धाड टाकताच कागलसह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.

मात्र पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या कारवाईविरोधात घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना त्या परिसरातून त्यांना हटवण्याचाही प्रयत्न केला.

ईडीने धाड टाकल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने पोलिसांकडून तिथून त्यांना हटवण्यात आले. त्यानंतर आपल्या नेत्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा ठपका ठेवत कार्यकर्त्यांनी शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ समर्थकांनी कागलमध्ये शोले स्टाईलने आंदोलन करत मुश्रीफांच्या समर्थनाथ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कार्यकर्त्यांनी कागलच्या गैबी चौकातील पाण्याच्या टाकीवर चढून ही कारवाई चुकीचे असल्याचे सांगत या कारवाईविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी आणि शोले स्टाईलने आंदोलन केल्यामुळे वातावरण तंग बनले होते. त्यानंतर  आंदोलन करणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना इतर कार्यकर्त्यांनी विनंती करून खाली उतरवण्यात आले.

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर दोन वेळा ईडीकडून कारवाई करण्यात आल्याने आता कोल्हापूरातील राजकारण ढवळून निघाले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.