शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सवमुर्तीला सोन्याच्या 350 सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार; संभाजीराजेंची घोषणा

Kolhapur News : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सवमुर्तीला सोन्याच्या 350 सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार; संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सवमुर्तीला सोन्याच्या 350 सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार; संभाजीराजेंची घोषणा
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 4:58 PM

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी संभाजीराजे यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत संभाजी राजे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सवमुर्तीला शुध्द सोन्यापासून बनवलेल्या 350 सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाची बैठक कोल्हापुरात संपन्न झाली. यावेळी बैठकीला जिल्ह्यातील अनेक शिवभक्त उपस्थित होते.

समितीच्या वतीने 350 व्या राज्याभिषेक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्व नियोजन करण्यात आलं आहे. यावर्षीच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सार्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून निर्माण करण्यात आलेल्या सुवर्ण होनांच्या 350 प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतींचा सुवर्णअभिषेक उत्सवमुर्तीवर करण्यात येणार आहे, असं संभाजीराजे यावेळी म्हणालेत.

महाराष्ट्रातील नामवंत सुवर्णपेठी असलेल्या चंदूकाका सराफ यांच्यावतीने या प्रतिकृती देण्यात आल्या आहेत. प्रतिवर्षी 1 सुवर्णहोन यामध्ये वाढवण्यात येणार आहे.

सोहळ्याच्या निमित्ताने गडावर 5 जून आणि 6 जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. संयोगीताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. गडावर येणाऱ्या शिवभक्तांच्यासाठी अन्नछत्र, निवाऱ्याची सोय, तात्पुरती स्वच्छतागृह, आपत्कालीन वैद्यकीय सेवा,शटल बस सेवा पिण्यासाठी स्वच्छ पाणी याची सोय करण्यात आली आहे. यावर्षी नानेदरवाजा ते महादरवाजा या शिवकालीन राजमार्गाने शिवभक्तांनी यावे, यामार्गाचे जतन आणि संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असंही संभाजी राजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या बैठकीला संयोगीताराजे, शहाजी राजे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, समितीचे सर्व कमिटी प्रमुख आणि इतर तालिम संघटनांचे प्रतिनिधी, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, अदिल फरास, राहुल चिकोडे, शेतकरी संघटनांचे जालंदर पाटील इतर पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.