CM Uddhav Thackeray : मोदींनी रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का? महागाईवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरं भरल्याचा आरोप केला होता. त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackeray) यांनी सणसणीत उत्तर दिलंय. देशात वाढलेल्या महागाईसह इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर बॅटिंग केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा (Kolhapur North By Election) प्रचार आता शेवटच्या टप्प्याला आला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा शिगेला पोहचल्या आहेत. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरं भरल्याचा आरोप केला होता. त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackeray) यांनी सणसणीत उत्तर दिलंय. देशात वाढलेल्या महागाईसह इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर बॅटिंग केली आहे. तसेच वरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही चांगलचं धारेवर धरलं आहे. पंतप्रधान मोदींनी लोकांना रेशन दिलं मात्र ते शिजवायचं कसं? सिलेंडरच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की लोकांना सिलेंडर घेणंचं परवडेना झालंय. त्यामुळे आधी कोरोनात थाळी वाजवली तशी रिकामा सिलेंडर वाजवायचा का? असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी महागाईवरून केंद्र सरकारला केला आहे.
महागाईवरूव केंद्रावर हल्लाबोल
तसेच केंद्राने जीएसटीचे पैसे दिले नाहीत म्हणतही त्यांनी हल्लाबोल चढला आहे. एक तर आमचा हक्काचा जीएसटी दिला नाही आणि पेट्रोल कर का कमी करत नाही म्हणून विचारता? त्यावेळी काही वाटतं नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. खोट नाट सांगून कदाचित इतर राज्यात तुमचं राजकारण चालत असेल पण महाराष्ट्त्रात त्याला फळं लागणार नाहीत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे. कोल्हापुरातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आहे. काँग्रेस उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारानिमीत्त ते बोलत होते.
भगवा पुसू देणार नाही
कोल्हापूर हा भगव्याची बालेकिल्ला आहे. नानांच्या प्रचाराला फडणवीस आले यावरून समजून जा. बोलायला काही मुद्दे नसले की भ्रम निर्माण करायचा ही त्यांची सवय आहे, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. रामाचा जन्म झाला नसता तर यांच राजकारण कस चाललं असतं? ते रेटून खोट बोलत आहेत ते सत्य आहे असं वाटत आहे. आपण कशातच कमी पडत नाही आम्ही खोट बोलण्यात कमी पडतो पण कमी पडलो तरी चालेल खोट बोलणार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. कोल्हापुरात सरकारचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यापुढे ही यशस्वी करायचा आहे. निवडणून आल्यावर गुण्या गोविंदाने कामं करा. रात्र वैऱ्याची आहे पण काळजी करू नका. कोल्हापूर मधून भगवा पुसेल असं कोणीही कितीही म्हणालं तरी शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून मी हे होऊ देणार नाही, असे विरोधकांना थेट आव्हानही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल