Kolhapur North Election Result : “राज्यातही महाविकास आघाडीचा कोल्हापूर पॅटर्न चालणार”, उदय सामंत यांचा चंद्रकांत पाटील यांनाही चिमटा

मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सुचक ट्टिट करत भाजपला (BJP) फटकारलंय. पराभवानंतर पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेली मते एकट्या पक्षाची असल्याचा दावा भाजपने केला होता.

Kolhapur North Election Result : राज्यातही महाविकास आघाडीचा कोल्हापूर पॅटर्न चालणार, उदय सामंत यांचा चंद्रकांत पाटील यांनाही चिमटा
कोल्हापूरच्या निकलावरून उदय सामंत यांची टोलेबाजीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:23 PM

रत्नागिरी : कोल्हापूर निवडणुकीतल्या (Kolhapur North Election Result) विजयानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सुचक ट्टिट करत भाजपला (BJP) फटकारलंय. पराभवानंतर पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेली मते एकट्या पक्षाची असल्याचा दावा भाजपने केला होता. या निवडणुकीत भाजप एकटा नव्हता तर भाजप सोबत आरपीआय, शिवसंग्राम, रासप. जनसुराज्य, रयत क्रांती आणि जनसुराज्य असे पक्ष होते. 77 हजार ही मते फक्त शिवसेनेचीच असतील तर इतर पक्षांची कोल्हापूरच्या निवडणुकीत मते नाहीत का? याच अर्थाने मी ट्विट केल्याचे उदय सामंत यांनी सष्ट केलंय. तसेच नवनीत राणा यांच्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा यांच्यासाठी मातोश्रीचा पल्ला अजून लांब आहे. त्यांनी अमरावतीमधील एखाद्या शाखा प्रमुख किंवा गट प्रमुखचे घर निवडत तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात ते बघावे अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे. शिवाय ज्यांना राजकीय संस्कृती नाही त्यावर का बोलायचं? असं सांगत उदय सामंत यांनी राणा कुटुंबीयांना उत्तर दिलंय.

राज्यातही हाच पॅटर्न चालणार

लोकशाही मध्ये हार जीत होत असते. कोण कुठे जाणार यावर मला बोलायचं नाही उलट कोल्हापूरच्या जनतेनीच काय ते दाखवून दिलंय. असं सांगत उदय सामंत यांनी नाव न घेता भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढलाय. कोल्हापूरातील राजकीय वातावरण तापलं होतं ते महाविकास आघाडीनं थंड केलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ते थंड कसं करायचं हे महाविकास आघा़डीला माहित आहे. महाविकास आघाडीचा पॅटर्न हा राज्यात यापुढे सुद्धा रहाणार असल्याचं मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय.

चंद्रकांत पाटील सोशल मीडियावर ट्रोल

चंद्रकांत पाटील यांना युवापिढी ट्रोल करतेय. त्यामुळे अच्छे दिन येणार असं सांगणाऱ्यांना युवा पिढी ट्रोल करतेय. कोल्हापूरच्या विजयानंतर हि विधासभा आणि लोकसभेची नांदी असल्याचं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलंय. काल पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला कोल्हापुरात मोठ्या परभवाचा सामना करावा लागला आहे. तर सतेज पाटलांनी लावलेली फिल्डिंग पुन्हा एकदा यशस्वी ठरलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीवरून राजकारण तापलं होतं. महाविकास आघाडीकडून या ठिकाणी जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीत लढवत होते. चंद्रकांत पाटलांसह अनेक बडे नेते कोल्हापुरात ठाण मांडून बसले होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका होताना दिसून येत आहे.

OBC reservation : नाना पटोले आणि बावनकुळे एकाच मंचावर; म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी आम्ही पक्षाचे जोडे बाहेर काढून मंचावर आलो

Devendra Fadnavis : दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, राऊतांचा आरोप; राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही म्हणाले…

Video : ‘राष्ट्रवादी पुन्हा’वर दत्तात्रय भरणे यांनी धरला ठेका, ‘मामां’ना कार्यकर्त्यांनी घेतलं ‘डोक्या’वर!

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...