मधुरिमाराजेंची माघार, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी यापुढे…
Satej Patil Meeting After Madhurima Raje Withdraw : कोल्हापूरच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता सतेज पाटील यांनी इंडिया आघाडीची बैठक घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. वाचा सविस्तर...
कालच्या विषयावर मी पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. पुढ कशा पध्दतीने जाऊ याविषयी चर्चा करणार आहे. इंडिया आघाडीचे पक्ष एकत्र केलते. या विधानसभेला सगळ्यांनी मदत करावी असं ठरलं आहे. मला कुठलाही वाद करायचा नाही, सगळ्या गोष्टी घडल्या त्या सर्वांसमोर आहे. पुढची दिशा, शिवसेना, राष्ट्रवादी, इंडिया आघाडीला सोबत घेऊन निर्णय घेणार आहे. शाहू महाराज छत्रपती यांच्याशी माझी चर्चा झाली. आम्ही सगळे मिळून नवीन वाद निर्माण करणार नाही. मला शाहू महाराजांचा आदरच आहे. गादीचा मान मी ठेवणारच आहे, असं सतेज पाटील म्हणाले.
कोल्हापूरच्या निवडणुकीवर काय म्हणाले?
थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे येत आहेत. एअरपोर्टला उद्धव साहेबांच्या स्वागतला जात आहे. उजळाईवाडीला उध्दव साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे. जिल्हातील सर्व उमेदवार भेटणार आहे. शिरोळमध्ये वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली. उत्तर, दक्षिण मध्येही वंचितची उमेदवारी मागे घेतली आहे. जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे माघार घेतली आहे. मी कुणावरही वक्तव्य करणार नाही. मला पुढचे 15 दिवस सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे, असंही सतेज पाटील म्हणालेत.
सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान केल्याचा आरोप धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांवर केला. त्याला सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातली जनता महायुतीला गायब करणार आहे. महाराष्ट्राची जनता पुतळा कोसळला ते विसरणार नाही.बदलापूर मध्ये काय झालं ते विसणार नाही, पुण्यातील हीट अॅंण्ड रन विसरणार नाही. 23 तारखेनंतर त्यांना गायब करतील. महाडिकांनी लोकसभेच्या निवडणुकीत उलटा प्रचार का केला? संजय मंडलीक जे बोलले त्याला ते काही बोलले का? निवडणुका म्हटल्यानंतर हे घडणारच आहे, असंही सतेज पाटील म्हणालेत.
राजेश लाटकर उद्धव ठाकरेंना भेटणार
दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता होणार भेट आहे. राजेश लाटकर कोल्हापूर उत्त मध्ये शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.