Kolhapur Rain Update: पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे; जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
कोल्हापूरसह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेच वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाची तातडीची आढावा बैठक घेऊन पूर स्थितीच्या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर: राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबईसह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, अमरावती भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने कोल्हापूरातील पंचगंगा (Panchganga River) नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पावसाचा जोर असाच कायम राहिला तर उद्या सकाळपर्यंत पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी वर्तवली आहे.
नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावानाही सतर्कतेचा इशारा (Red Alert) देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नद्यांना पूर
कोल्हापूरसह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेच वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाची तातडीची आढावा बैठक घेऊन पूर स्थितीच्या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिरोळ, हातकणंगले करवीरमधील गावांना इशारा
कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक तालुक्यातून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बैठक घेऊन प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच कोल्हापूर शहराबरोबरच शिरोळ, हातकणंगले करवीर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या गावांना धोका
पावसाचा जोर वाढत असून नदीकाठच्या गावांना धोका असल्याने जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले आहे की, पावसाचा जोर कायम राहिल्यास जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.