Kolhapur Rain: राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत 347.40 फूट इतकी झाली आहे. 347.50 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता असून, नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले आहे.
कोल्हापूरः गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड जोरदार पाऊस (Kolhapur Heavy Rain) सुरू आहे. कोल्हापुरसह राधानगरी धरण (Radhanagari Dam) परिसरात ही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मंगळवारी दिवसभर पाऊस थांबला होता. त्यामुळे धरणाची पाणी पातळी स्थिर होती, आज पहाटे पावसाचा जोर वाढला असून पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास धरणाचा 6 नंबरचा दरवाजा उघडण्यात आला. तर दरम्यान सकाळी 8.55 वाजता धरणाचा दुसरा स्वयंचलित दरवाजाही खुला (Automatic door open). या दोन दरवाजातून 2856 क्युसेक व धरणातून खासगी वीजनिर्मितीसाठी 1600 क्यूसेक असा एकूण 4456 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे. राधानगरी धरण परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने सध्या स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत.
#कोल्हापूर #राधानगरीधरण दि. 10 ऑगस्ट 2022,दुपारी 3:20 वाजता स्वयंचलित द्वार क्रं 4 उघडले आहे. एकूण 4 दरवाजे (3,4,5,6 )उघडले आहेत. विसर्ग : चार दरवाज्यातून 5712 क्युसेक पाॅवर हाऊसमधून 1600 क्युसेक एकूण विसर्ग : 7312 क्युसेक सुरू आहे.@MahaDGIPR @InfoDivKolhapur @MahaDGIPR pic.twitter.com/cB2B3MF7c8
— DISTRICT INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@Info_Kolhapur) August 10, 2022
धरण पूर्ण क्षमतेने भरले
राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत 347.40 फूट इतकी झाली आहे. 347.50 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता असून, नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले आहे.
#कोल्हापूर #राधानगरीधरण दि.10 ऑगस्ट 2022, दुपारी 2:20 वाजता स्वयंचलित द्वार क्रं 3 उघडले आहे. एकूण 3 दरवाजे (3 ,5, 6 ) उघडले आहेत. विसर्ग : तीन दरवाज्यातून 4284 क्युसेक पाॅवर हाऊसमधून 1600 क्युसेक एकूण विसर्ग : 5884 क्युसेक सुरू@MahaDGIPR @InfoDivKolhapur pic.twitter.com/mra55RY4Mp
— DISTRICT INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@Info_Kolhapur) August 10, 2022
धरणातील पाण्याचा विसर्ग 1428
धरणातील पाण्याचा विसर्ग 1428 तर पॉवर हाऊसमधून 1600 क्यूसेक असा एकूण 3028 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गावांना सतर्कतेचा इशारा
जोरदार पावसामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज दुपारी 12 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 04 इंच इतकी झाली होती त्यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पंचगंगेवरील 75 बंधारे पाण्याखालील गेले असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.