Radhanagari picnic spots : राऊतवाडी धबधब्यासह राधानगरीतील पिकनिक पॉईंट तूर्तास बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील सर्व मान्सून पिकनिक पॉईंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. Kolhapur Radhanagari picnic spot ban

Radhanagari picnic spots : राऊतवाडी धबधब्यासह राधानगरीतील पिकनिक पॉईंट तूर्तास बंद
Rautwadi waterfall, Kolhapur radhanagri picnic spots
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 10:58 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पावसाने निसर्गाला बहर आला असून, धबधबे प्रवाहित झाले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील सर्व मान्सून पिकनिक पॉईंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये प्रसिद्ध असलेल्या राऊतवाडी धबधबासहीत अनेक धबधब्यांचा समावेश आहे. महसूल, पोलीस, वन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या बैठकीत हा एकमुखी निर्णय घेण्यात आला. (Kolhapur Radhanagari picnic spot ban)

बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेही नियंत्रण राहू शकणार नाही. त्यामुळे तालुक्यातील धबधबे, धरणे, अभयारण्य अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राधानागरी परिसरात कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस आणि वन खात्यातर्फे संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.

त्यामुळे यंदा पर्यटकांना मान्सूनचा आनंद घेता येणार नाही. दुसरीकडे त्याचा आर्थिक फटका स्थानिक व्यावसायिकांना बसणार आहे. राधानगरी इथं काल महसूल,पोलीस, वन व स्थानिक ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत पावसाळी पर्यटन आणि राधानगरी परिसरात वाढत असलेला कोरोनाचा उच्छाद पाहता, त्याला आळा घालण्यासाठी पर्यटनावर बंदीचा निर्णय घेण्यात आला.

निसर्गरम्य राधानगरी संपूर्ण कोल्हापूर जिल्हाच निसर्गरम्य जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी राधानगरी तालुक्याला विशेष महत्त्व आहे. या तालुक्यावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. हिरवीगार झाडी, घनदाट जंगल, धुवाँधार पाऊस, रानवाटा, कोसळणारे धबधबे आणि रानमेवा असं पर्यटनासाठी किंवा ट्रेकर्ससाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व राधानगरी तालुक्यात आहे.

राधानगरी धरण, तुळशी धरण, दाजीपूर अभयारण्य, काळम्मावाडी, हसणे, धरणं, राऊतवाडी, म्हसोबा, भैरी ही धरणं, फोंडा घाट असा निसर्गरम्य परिसर पर्यटकांच्या पसंतीसाठी परिचीत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे. गगनबावडा, राधानगरी, मलकापूर, शाहूवाडी या क्षेत्रामध्ये पावसाने तुफान हजेरी लावली. जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

तळकोकणातून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक विस्कळीत

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने फोंडाघाट-पाचोबा देवस्थानाजवळ रस्त्यावर भले मोठे झाड पडले. त्यामुळे कोल्हापूरकड़े जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रात्री 1 च्या सुमारास हे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळले. फोंडाघाट-कणकवली आणि फोंडाघाट-कोल्हापूर वाहतूक रात्रीपासून ठप्प झाली आहे.

(Kolhapur Radhanagari picnic spot ban)

संबंधित बातम्या 

औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस 

सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.