समरजित घाटगे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार; पक्षप्रवेशासाठी शरद पवारांनी गैबी चौकच का निवडला?

Samarjeet Ghatge Will join NCP Sharad Pawar Group : भाजपचे समरजित घाटगे आज राष्ट्रवादी शरद पवार प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेशासाठी शरद पवारांनी गैबी चौकच निवडला आहे. पण शरद पवारांनी पक्षप्रवेशासाठी हीच जागा का निवडली? इतिहास काय आहे? वाचा सविस्तर...

समरजित घाटगे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार; पक्षप्रवेशासाठी शरद पवारांनी गैबी चौकच का निवडला?
समरजित घाटगे, Sharad PawarImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 8:36 AM

विधानसभा निवडणुकीआधी राजकीय वर्तुळात बदल व्हायला सुरुवात झाली आहे. विधानसभा लढवण्यासाठी उमेदवारीसाठी इच्छूक असणाऱ्या नेत्यांच्या पक्षांतराला आता सुरुवात झालीय आणि या सगळ्याची सुरुवात झालीय छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असणाऱ्या कागलमधून… शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, भाजपचे नेते समरजित घाटगे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे. शरद पवार सध्या चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्या दरम्यान आज समरजित सिंह घाटगे यांचा पक्षप्रवेश होत आहे.

समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाआधी कागलमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. वस्ताद येत आहेत… असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे कागलमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

पवारांनी गैबी चौकच का निवडला?

कागलमधील गैबी चौक या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जाहीरसभा होणार आहे. या सभेत समरजित घाटगेंचा पक्ष प्रवेश होईल. पण पवारांनी या पक्षप्रवेशाचं जे ठिकाण निवडलं आहे. त्यात बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. कागलमधल्या गैबी चौकात मंत्री हसन मुश्रीफ यांचं घर आहे. मुश्रीफांच्या अनेक सभा या गैबी चौकातील मैदानावरच होत असतात. तिथं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठेवत शरद पवारांनी मोठा राजकीय संदेश दिल्याचं बोललं जात आहे. मात्र या जागेवर शरद पवार आधीपासून सभा घेत आहेत. ती शरद पवारांची सभा घेण्याची जागा आहे, असं समरजित घाटगे यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

समरजित घाटगे पक्षांतर का करत आहेत?

2016 समरजित घाटगे यांनी भाजपत प्रवेश केला. पण 2019 च्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे समरजित घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. हसन मुश्रीफ यांच्याकडून घाटगेंचा पराभव झाला. यंदा ते भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक होते. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत आहे. काहीच दिवसांआधी अजित पवार कागलमध्ये आलेले असताना त्यांनी मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे समरजित घाटगेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष होतं. कार्यकर्त्यांशी बोलून घाटगेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.