राहुल गांधींच्या दौऱ्याआधी काँग्रेस नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, महाविकास आघाडीत…
Satej Patil on Vidhansavha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याआधी कोल्हापुरातील बड्या नेत्याने विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. सतेज पाटील यांनी जागावाटपावर भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...
काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या म्हणजेच 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापुरातील कसबा- बावडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. 4 तारखेला राहुल गांधी यांचा कोल्हापुरातच मुक्कामी असणार आहेत. राहुल गांधी यांच्या या दौऱ्याआधी कोल्हापुरातील काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावर 200 च्यावर जागांवर एकमत झालं आहे, असं सतेज पाटील म्हणालेत.
राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत काय म्हणाले?
शाहू महाराजांच्या भूमीत आम्ही राहुल गांधींना निमंत्रित केलं आहे. उद्या त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. तर संविधान सन्मान कार्यक्रम होणार आहे आहे. शाहू स्थळाला देखील ते भेट देणार आहेत. कसबा बावड्यातील भगव्या चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय वर्षभर तुम्ही आम्ही घेतला होता. राहुल गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
महायुतीच चर्चा करण्यासारखा आता काही राहिलेले नाही. त्यांनी लोकांचा भ्रमनिरास झालं आहे. 2029 ला शंभरच्या आतच भाजप आपल्याला दिसेल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील राहुल गांधी राज्यातील नेत्यांशी बोलतील. याचा फायदा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला होईल. मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मॅन्डेड पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी दिला होता, असं सतेज पाटील म्हणाले.
जागावाटप कधी होणार?
जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीत 200 वर जागांवर एकमत झालं आहे. लवकरच जागावाटपाची निश्चिती होईल. आपल्या विचाराचं सरकार आणायचं असेल तर काँग्रेसला सहकार्य केलं पाहिजे, असा विचार जनता करत आहे. जाईल तिथे लोक म्हणत आहेत काँग्रेसचंच सरकार बरं होतं. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागात काँग्रेसला पसंती मिळत आहे. मला खात्री आहे की, आम्ही तिन्ही पक्ष मिळून पूर्ण बहुमत आणू. आम्हाला कोणाची गरज लागणार नाही, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.