अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने गाठला क्रूरतेचा कळस; दगडावर डोके आपटून गुप्तांग कापले

| Updated on: May 16, 2022 | 11:37 PM

पत्नीचे असलेल्या अनैतिक संबंधात त्याचा अडसर ठरत असल्याने पत्नीने पती दारु पिऊन आल्यानंतर त्याला मारहाण केली. पती दारुच्या नशेत असल्याने तिने जांभा दगडावर डोके आपटला त्यानंतर त्याचा गळा आवळून हत्या केली गेली. त्यानंतर त्याच्या पतीत्नीने त्याचे गुप्तांगही सुरीने कापून पतीची हत्या केली.

अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने गाठला क्रूरतेचा कळस; दगडावर डोके आपटून गुप्तांग कापले
कोल्हापूर जिल्ह्यामधील शाहूवाडीत पत्नीकडून पतीची हत्या
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

कोल्हापूरः मद्यपान करुन मारहाण करणाऱ्या आणि अनैतिक संबंधास अडसर ठरत असलेल्या पतिची पत्नीनेच निघृण हत्या (Husband Murder) केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील नांदगांवमध्ये (Nandgaon Shahuwadi) घडली आहे. दारु पिऊन सतत मारहाण सतत होणाऱ्या मारहाणीमुळे मृत कांबळेचे पत्नी कंटाळली होती, त्यातच दोघा पती पत्नीमध्येही सतत वाद होऊन पती तिला मारहाण (Beating) करत होता. आणि अनैतिक संबंधातही पतीचा अडसर ठरत असल्याने नांदगावमधील पत्नीने जांभा दगडावर पतीचे डोके आपटून गळा आवळून आणि त्यानंतर पतीचे सुरीने गुप्तांग कापून आपल्या पतीची तिने हत्या केली. या घटनेमुळे शाहुवाडी तालुक्यात खळबळ माजली आहे.

पती पत्नीत सतत वाद

या प्रकरणात ज्याचा मृत्यू झाला आहे तो मृत लोळाणे येथील मूळचा रहिवासी, गावात काम नसल्याने तो नांदगाव येथे शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होता. मात्र त्याच्या दारूच्या व्यसनामुळे पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते. त्यातूनच दारु पिऊन येऊन तो सतत आपल्या पत्नीला मारहाण करत होता. त्यामुळे त्याच्या या जाचाला ती कंटाळली होती. तसेच पत्नीचे असलेल्या अनैतिक संबंधात त्याचा अडसर ठरत असल्याने पत्नीने पती दारु पिऊन आल्यानंतर त्याला मारहाण केली. पती दारुच्या नशेत असल्याने तिने जांभा दगडावर डोके आपटला त्यानंतर त्याचा गळा आवळून हत्या केली गेली. त्यानंतर त्याच्या पतीत्नीने त्याचे गुप्तांगही सुरीने कापून पतीची हत्या केली.

आत्महत्या केल्याचा बनाव

शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव पैकी मांगुरवाडी येथील या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पतीची हत्या करुनही त्यानंतर दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचा पत्नीने रचलेला बनाव पोलिसांच्या तपासामुळे तिचा प्रयत्न फोल ठरला. गेल्या काही दिवसांपासून त्याला दारुचे व्यसन लागले होते.

वादामुळे पत्नीने हे टोकाचे पाऊल

दारुच्या व्यसनामुळेच दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे त्यांना अनेकदा समजावूनही सांगण्यात आले होते, मात्र त्याच्या दारुमुळे आणि वादामुळे पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.