निवडणुकीत शिवसेना पक्षाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार…; शंभुराज देसाई यांचं महत्वाचं विधान
Shambhuraj Desai on CM Eknath Shinde in Shivsena Maha Adhiveshan 2024 : विरोधकांच्या टीकेला मंत्री शंभुराज देसाई यांचं प्रत्युत्तर... मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही शंभुराज देसाई यांनी भाष्य केलं. कोल्हापुरातील महाअधिवेशनात शंभुराज देसाई काय म्हणाले? वाचा सविस्तर...
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 17 फेब्रुवारी 2024 : शिंदे गटाचं महाअधिवेशन कोल्हापुरात होतंय. महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी या अधिवेशनात बोलताना आगामी निवडणुकीवर भाष्य केलं. काल दिवसभराचे कामकाज विशेष पत्रिका नुसार झालं. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा प्रस्ताव मंजूर झाला. 370 कलम जो रद्द झाला त्या संदर्भात प्रस्ताव होता त्यामध्ये अमित शाहा यांचा अभिनंदन केलं. मिशन 48 यासाठी महायुतीकडून सर्वांना एकत्र घेऊन सर्व जागा लढवणार आणि त्यातील किमान 45 जागा आम्ही जिंकणार आहोत. पक्ष संघटनेमध्ये निवडणुकी संदर्भातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मताने देण्यात आले, असं शंभुराज देसाई म्हणाले.
कोल्हापुरातील अधिवेशनात शंभुराज देसाई यांचं भाषण
शिवसेनेच्या या अधिवेशनात अजून पाच ते सहा असे ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणापूर्वी मांडण्यात येतील. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने आणि एकूण महत्त्वाचे विषय त्यामध्ये मांडले जातील. एका वेगळ्या पार्श्वभूमीवर दीड दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक भूमिका घेतली. विरोधक आमच्यावर टीका करतात. पण आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ, असं म्हणत शंभुराज देसाई यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.
विरोधकांना उत्तर
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच विरोधकांकडून सुरुवात झाली होती की हे काही काळ सरकार टिकेल. सकाळी दहा वाजता एक माणूस बोलत होता. पण सरकार आलं तेव्हापासूनच आमचं संख्याबळ वाढत जात आहे. ज्यांना हे भगवंत नाही ते अशी टीका करतात. आपला शाखाप्रमुख सुद्धा मुख्यमंत्री काय काम करतो याचे अपडेट त्याच्यापर्यंत असले पाहिजेत. आम्हाला कोणाच्या प्रश्नांची उत्तर देण्याची गरज नाही. विरोधकांच्या प्रत्येक टीकेला चांगल्या कामाने उत्तर देऊ, असं शंभुराज देसाई म्हणाले.
जरांगेंच्या उपोषणावर शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यावर शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांचं काय म्हणणं आहे ते मला खरंच कळलं नाही. पण जरांगे पाटील यांच्यासाठी सरकारमध्ये सहानुभूती आहे. तुम्ही मान्य केलं की हे शिंदेसाहेबांमुळे झालंय. पण त्याला थोडा वेळ लागतो. त्याला काही प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर आपण सुरू केलेली आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले.