इंडिया आघाडीत वादविवाद; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, पुढची भूमिका काय?

Sharad Pawar on India Alliance : इंडिया आघाडीतील फुटीवर शरद पवार यांचं सगळ्यात मोठं विधान; आता पुढची भूमिका काय? केंद्रात सत्ता राखायची आणि राज्यातील सत्ता कसं ही करून मिळवायची हा भाजप आणि मोदींचा धोरणात्मक कार्यक्रम आहे, असंही पवार म्हणाले. वाचा सविस्तर...

इंडिया आघाडीत वादविवाद; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, पुढची भूमिका काय?
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 9:11 AM

भूषण पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 21 फेब्रुवारी 2024 : या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधीपक्षांनी एकत्र येत आघाडी केली. नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं आणि भाजपविरोधात मजबूत लढा देण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली. मात्र निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच इंडिया आघाडीत फूट पडल्याचं दिसलं. आधी ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला रामराम करत भाजपची सोबत केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीत पुढे काय घडणार? इतर विरोधाी पक्षांची भूमिका काय असेल याची चर्चा देशभर होऊ लागली. महाराष्ट्रात काय होणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंडिया आघाडीतील वादविवादावर भाष्य केलंय.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी इंडिया आघाडीतील सद्यस्थितीवर भाष्य केलं. इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद आहेत. मात्र ते मिटवण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आम्ही सगळे एकत्र आहोत. मोदी सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय, असं शरद पवार म्हणाले.

इंडियाआघाडीतील वादावर पवारांचं वक्तव्य

इंडिया आघाडीची अलिकडे बैठक झाली नाही. काही पक्षांची भूमिका त्या त्या राज्यपूर्ती सीमित आहेत. काही राज्यात वादविवाद आहे, हे नाकारता येत नाही. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल याठिकाणी आम्ही परिस्थितीवर चर्चा अजून झाली नाही. काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष आहे. महाराष्ट्रातील चर्चेबाबत आमच्याकडून मी असत नाही. आमच्याकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि सेनेकडून संजय राऊत चर्चा करतात. निपाणी लोकसभेच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय. सुदैवाने कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील 3 जागांबाबत महाविकास आघाडीत निर्णय झाला नाही उद्या याबाबत बैठक होणार आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला आश्चर्य वाटत नाही. आदर्श बाबत एक श्वेतपत्र काढले आणि जे व्हायचं ते झालं, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावर शरद पवारांनी भाष्य केलंय.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.