भाजपला पुन्हा मोठा धक्का; कोल्हापुरातील बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार?

Kolhapur NCP Sharad Pawar Group : कोल्हापुरातील बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. भाजपला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कोण आहे हा नेता? कोल्हापुरात काय घडतंय? वाचा सविस्तर...

भाजपला पुन्हा मोठा धक्का; कोल्हापुरातील बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार?
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 12:31 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. या दौऱ्या दरम्यान शरद पवार विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यातून ते आगामी निवडणुकीची रणनिती ठरवतायेत. काहीच दिवसांआधी शरद पवारांनी कोल्हापूर भाजपला मोठा धक्का दिला. समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता कोल्हापुरात शरद पवार भाजपला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. चंदगडमधील भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होत आहे.

कोल्हापुरात पुन्हा भाजपला धक्का बसणार?

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हयातील भाजपचा मोठा नेता शरद पवार यांच्या गळाला लागला असल्याची चर्चा होत आहे. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजप नेते शिवाजीराव पाटील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती आहे.

शिवाजीराव पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार?

शिवाजीराव पाटील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कागलमधून समरजीत घाटगे यापूर्वीच पवारांच्या पक्षात आले आहेत. आता चंदगडमधून शिवाजीराव पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवाजीराव पाटील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. शिवाजीराव पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होऊ लागल्याने भाजपचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. भाजप नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष देणार की नाही? असा सवाल सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

शिवाजीराव पाटील यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. येत्या काळात शिवाजीराव पाटील हे काय भूमिका घेतात? शरद पवार गटात प्रवेश करतात का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?.
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य.
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका.
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?.
एन्काऊंटर स्टोरीत प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं ट्विस्ट, ऑडिओमध्ये काय?
एन्काऊंटर स्टोरीत प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं ट्विस्ट, ऑडिओमध्ये काय?.
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला.