आरोप करणारे किती गुणी आहेत, हे घराघरात माहितीय; शिंदे गटावर ‘या’ नेत्याचा घणाघात

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना त्यांनी कोल्हापूरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरही निशाणा साधला.

आरोप करणारे किती गुणी आहेत, हे घराघरात माहितीय; शिंदे गटावर 'या' नेत्याचा घणाघात
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 7:20 PM

कोल्हापूरः सध्या राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. त्यावरुनच आता आरोप-प्रत्यारोपामुळे कोल्हापूरात राजकीय आखाडा उभा राहिला असल्याचे दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना त्यांनी कोल्हापूरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरही निशाणा साधला.

यावेळी संजय पवार बोलताना म्हणाले की, खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून बाळकडू घेतले आहे.

त्यामुळे निष्ठा काय असते ते या दोघांकडून शिकलं पाहिजे अशा शब्दात राऊत आणि विनायक राऊत यांची स्तुती केली आहे. विरोधकांकडून म्हणजे शिंदे गटाकडून ज्यावेळी उद्धव ठाकरे गटांवर टीका केली जाते.

उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते त्यावरही संजय पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जे सदगृहस्थ आरोप करतात त्यांची योग्यता काय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तर उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना चांगलं काय, वाईट काय समजतं असं मतही त्यांनी व्यक्त केले.

तर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर ज्यावेळी टीका केली जाते. त्यावरुनही संजय पवार यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, आरोप करणारे किती गुणी आहेत हे कोल्हापूरात घराघरात माहिती आहे.

नेत्यांनी त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांना सांगण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटावर निशाणा साधताना ते म्हणाले की, आपली योग्यता काय,आपण कोण आहोत हे पाहून त्यांनी आरोप करावेत असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

संजय राऊत यांना शंभर दिवस कारागृहात काढावे लागले तरी ते झुकले नाहीत, त्यामुळे अशा माणसांवर वाटेल ती टीका केली जात असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

विकासात्मक बोलायला यांच्याकडे दुसरे काही मु्द्दे नाहीत, त्यामुळेच राज्यातील औद्योगिक, उद्योगधंदे बाहेर जात असल्याची टीकाही संजय पवार यांनी शिंदे गटावर केली.

त्यांच्याकडे विकासात्मक घटना घडामोडी नसल्यानेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.