VIDEO | कारखान्याचा गळित हंगाम संपल्याने धिंगाणा, कोल्हापुरात ट्रॅक्टर चालकांनी चिअर गर्ल्स नाचवल्या
कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याच्या आनंदात या चालकाने चक्क दोन तरुणींना बोलावून ट्रॅक्टरवर डान्स करायला लावला. (Kolhapur Tractor Cheer Girls Dance)
कोल्हापूर : कारखान्याचा गळित हंगाम संपल्याच्या आनंदात ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांनी धिंगाणा घातल्याचं समोर आलं आहे. कोल्हापुरातील ट्रॅक्टर चालकांनी चक्क भरचौकात चिअर गर्ल्स नाचवल्या. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. (Kolhapur Tractor Driver makes Cheer Girls Dance Video Viral)
दोन तरुणींचा ट्रॅक्टरवर डान्स
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने कोल्हापुरात अक्षरशः धिंगाणा घातला. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याच्या आनंदात या चालकाने चक्क दोन तरुणींना बोलावून ट्रॅक्टरवर डान्स करायला लावला. कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.
भोगावती कारखान्यासाठी ऊस वाहतूक
कोल्हापुरातील भोगावती कारखान्यासाठी हे ट्रॅक्टर ऊस वाहतूक करत होते. चालकांनी मद्यपान करुन चिअर गर्ल्स नाचवल्याचा आरोप केला जात आहे. तरुणाींचा डान्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.
ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग
यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. डान्स पाहण्यासाठी जमलेले सर्वच जण विनामास्क होते. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना नागरिकांनी हलगर्जी बाळगल्याबद्दल चीड व्यक्त केली जात आहे. कोल्हापुरात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली आहे.
पाहा व्हिडीओ :
कोल्हापुरात कोरोना काळातील क्रिकेट स्पर्धांमध्येही चिअर गर्ल्स
कोल्हापुरात चिअर गर्ल्स नाचवण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधीही कोरोना काळातच (डिसेंबर 2020) क्रिकेट स्पर्धांमध्ये चिअर गर्ल्स नाचवल्याचा व्हिडीओ समोर आला होता. कोरोनाबाबातचे सर्व नियम धुडकावून कोल्हापुरातील पाटीलवाडीत एक आगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा पार पडली, तीही चक्कर चिअर गर्ल्सच्या साथीने. (Kolhapur Tractor Driver makes Cheer Girls Dance Video Viral)
चिअर गर्ल्सचा नाच असा होता की, क्रिकेट बाजूला ठेवून आसपासच्या गावांमधील शेकडो तरुणांनी वेगळाच खेळ मांडला होता. डॉल्बीच्या ठेक्यावर चाललेला हा धिंगाणा पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला. पोलीस घटनास्थळाजवळ पोहोचताच संयोजकांसह चिअर गर्ल्स आणि नाचणाऱ्या पोरांनी धूम ठोकली होती.
संबंधित बातम्या :
(Kolhapur Tractor Driver makes Cheer Girls Dance Video Viral)