कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीत 7 नवे रुग्ण, तर सिंधुदुर्गात आठ जण पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे 7 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे रत्नागिरीतील कोरोना रुग्णांची संख्या 132 वर पोहोचली (Konkan Corona Cases) आहे.

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीत 7 नवे रुग्ण, तर सिंधुदुर्गात आठ जण पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: May 23, 2020 | 5:21 PM

सिंधुदुर्ग : कोकणात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत (Konkan Corona Cases) आहे. रत्नागिरीत 7 नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 135 वर पोहोचली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एकाच दिवशी 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांचा आकडा 16 वर पोहोचला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (23 मे) आणखी 8 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह  (Konkan Corona Cases)  आले. यात कणकवली 6, वैभववाडी 1 आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या कणकवलीतील 4 रुग्ण हे मुंबईतून प्रवास केलेले आहेत. तर दोन व्यक्तींनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून प्रवास केला आहे. मालवण तालुक्यातील रुग्ण हा ठाणे येथून आलेला आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्ण हा प्रभादेवी मुंबई येथून आलेला आहे.

या नवीन 8 रुग्णांमध्ये 4 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. 8 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 16 झाली आहे. यातील 5 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तर रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे 7 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे रत्नागिरीतील कोरोना रुग्णांची संख्या 132 वर पोहोचली आहे. दुर्देवाने रत्नागिरीत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहेत. तर 37 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 91 वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत रत्नागिरीतील एकूण 4672 नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील 4278 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रत्नागिरीत जिल्ह्यात जवळपास 4 हजार 951 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी तब्बल 45 हजार 851 जणांनी अर्ज केला आहे. तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 56 हजार 314 अर्ज आले (Konkan Corona Cases) आहे.

संंबंधित बातम्या : 

फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह, कळंब रुग्णालयाचा कारभार

मुंबई ते वर्धा पायपीट, गावी परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.